अंधेरीमधील गोखले पुलाचा काही भाग कोसळला

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    03-Jul-2018
Total Views |

अप-डाऊन मार्गाची रेल्वे वाहतूक ठप्प




अंधेरी (मुंबई) : पूर्व-पश्चिम अंधेरीला जोडणाऱ्या गोखले पुलाचा काही भाग आज सकाळी अचानकपणे कोसळला आहे. यामध्ये दोन नागरिक जखमी झाले असून अंधेरीहून होणारी रेल्वे वाहतूक यामुळे पूर्णपणे ठप्प झाली आहे. दरम्यान अंधेरीमध्ये मुसळधार पाऊस असल्यामुळे मदतकार्यामध्ये देखील अडथळा निर्माण होऊ लागला आहे.

आज सकाळी ७.४५ सुमारास ही घटना घडली. गेल्या काही दिवसांपासून विश्रांती घेतलेल्या पावसाने आज मुंबईसह सर्व उपनगरांमध्ये हजेरी लावण्यास सुरुवात केली आहे. याच दरम्यान सकाळी गोखले पुलावरील पादचारी मार्गाचा काही भाग कोसळला. कोसळलेला संपूर्ण भाग हा पुलाखालील रेल्वे मार्गावरच येऊन पडल्यामुळे रेल्वेची वाहतूक ठप्प झाली. परंतु सुदैवाने यावेळी पुलाखाली आणि पुलावर गर्दी नसल्यामुळे मोठा अपघात टळला.



दरम्यान स्थानिक प्रशासनाकडून तातडीने याठिकाणी मदतकार्य सुरु करण्यात आले आहे. गोखले पुलाचा हा भाग अत्यंत जीर्ण झाल्यामुळे कोसळल्याची माहिती स्थानिकांनी दिली आहे. यामुळे पुलावरून होणारी वाहतूक देखील थोड्या वेळासाठी बंद करण्यात आली आहे. तसेच काही मार्गांवरील वाहतूक देखील वळवण्यात आली आहे. त्यामुळे पुलाच्या दोन्ही बाजूला वाहतूक कोंडी होताना दिसत आहे.




@@AUTHORINFO_V1@@