मुंबईत पावसाचा हाहाकार; कुठे काय घडलं? जाणून घ्या एका क्लीकवर...

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    03-Jul-2018
Total Views |



 

मुंबई : जुलैच्या पहिल्याच पावसाने मुंबईला चांगलाच झटका दिला आहे. त्यामुळे मुंबईकरांची आज सकाळपासून दैना उडाली. अंधेरीला पूल पडला असल्याकारणाने पश्चिम रेल्वेवरील वाहतुकीवर परिणाम होत असताना मध्य रेल्वेही उशिराने धावत आहे. त्याच बरोबर ठीक-ठिकाणी रस्त्यावरही वाहतूक धीम्या गतीने चालू आहे. जर पावसाचा जोर कमी झाला नाही तर मध्य रेल्वेही ठप्प होण्याची शक्यता आहे. त्यामुळे आज कामानिमित्त बाहेर पडणाऱ्या मुंबईकरांचे प्रचंड हाल होण्याची शक्यता आहे.

 

अंधेरीत पादचारी पूल कोसळला

पश्चिम रेल्वे मार्गावरील अंधेरीत स्थानकात रेल्वे रुळावर पादचारी पूल कोसळून मोठा अपघात झाला आहे. यात पाच जण जखमी झाले आहेत. जीवितहानीचे कुठलेही वृत्त अद्याप हाती आलेले नाही. मात्र, पुलाच्या ढिगाऱ्याखाली काही जण अडकले असण्याची भीती व्यक्त होत आहे.

 

मोटरमनचा इमर्जन्सी ब्रेक, अनेक प्रवाशांचे वाचले प्राण

अंधेरी येथे रेल्वे रुळांवरुन जाणारा गोखले पूल सकाळी साडेसात वाजण्याच्या सुमारास कोसळला. मात्र, या अपघातात पश्चिम रेल्वेचे मोटरमन चंद्रशेखर सावंत यांनी दाखवलेल्या प्रसंगवधनामुळे अनेक प्रवाशांचे प्राण बचावले. 'काही सेंकदाचा फरक होता. पूल आणि लोकलमध्ये फक्त ६० ते ६५ मीटरचे अंतर होते. आणखी काही सेंकद उशीर झाला असता तर अनर्थ वाईट प्रसंग ओढावला असता', असे सावंत यांनी यांनी सांगितले.

 

 
 
 

रस्त्यांवर वाहतुकीची कोंडी

लोकल सेवा ठप्प व संथ झाल्याकारणाने लोकांना रस्त्याने जाण्याचा पर्याय निवडला असून रस्त्यांवरही वाहतूक कोंडी झाली आहे. सोबतच अनेक ठिकाणी पाणी साचल्याने वाहतूक अत्यंत धीम्या गतीने सुरु आहे.

 

सायनला ट्रॅकवर साचलं पाणी

रात्रीपासून कोसळणाऱ्या मुसळधार पावसामुळे सायन रेल्वे स्थानकात ट्रॅकवर पाणी साचलं आहे. सध्या धीम्या गतीने ट्रेन जात असून पाऊस सुरु राहिल्यास लोकलसेवा बंद करावी लागण्याची शक्यता आहे.

 

 
 

कुर्ला-टिळकनगर परिसरात पाणी

लोकल सेवेच्या हार्बरलाईनवर कुर्ला व टिळकनगर परिसरात पटरीवर पाणी साचलं आहे. यामुळे हार्बर लाईनची लोकल सेवा धीम्या गतीने व उशिराने सुरु आहे.

 

कलिना येथे डबल डेकर बसची रेलिंगला धडक

सांताक्रुझ येथील कलिना परिसरात डबल डेकर बसने रेलिंगला धडक दिली. ‘बेस्ट’ची डबल डेकर बस वांद्रे येथून मुंबई विद्यापीठाच्या दिशेने जात होती. बसच्या समोरील भागाचे नुकसान झाले आहे.

 

 
 

मीरा रोडला तिकीट घराला आग

मीरा रोड येथील रेल्वे तिकीट घराला खूप मोठी आग लागली असून ती प्रयत्नात आणण्याचा आटोकाट प्रयत्न सुरु आहे.

 

कमला मिल आग

कमला मिल कंपाऊंडमधील इमारतीत शॉर्ट सर्किटमुळे आग लागली आहे. सुदैवाने आगीत कोणीही जखमी झालेलं नाही.

 

डबेवालेही ठप्प

मुंबईकरांना दररोज न चुकता वेळेवर डबा पोहोचवणाऱ्या डबेवाल्यांनी पश्चिम रेल्वे सेवा ठप्प झाल्याने त्यांची आजची सेवा रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे आज मुंबईकरांना उपवास घडण्याचीही शक्यता आहे.

 

 
 

विद्यार्थ्यांना दिलासा

आज विविध ठिकाणी झालेल्या अतिवृष्टीमुळे व अंधेरी पूल दुर्घटनेमुळे जे विद्यार्थी मुंबई विद्यापीठाच्या परीक्षेस पोहचू शकले नाहीत. त्या विद्यार्थ्यांची पुन्हा परीक्षा घेतली जाईल. त्याचे वेळापत्रक लवकरच जाहीर केले जाईल, असे मुंबई विद्यापीठाच्या परीक्षा विभागामार्फत जाहीर करण्यात आले आहे. 
@@AUTHORINFO_V1@@