बोदवड येथे जि.प.च्या उर्दु कन्या शाळेत चोरी

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    03-Jul-2018
Total Views |

शैक्षणिक साहित्याची नासधूस

बोदवड, ३ जुलै :
येथील प्रभाग क्रमांक ८ मधील उर्दू कन्या शाळेत सोमवारी रात्री ९ ते सकाळी ६ च्या सुमारास अज्ञात चोरट्यांनी शाळेची संरक्षक भिंत तोडून आत प्रवेश करुन शाळेतील वर्ग खोल्यांचे कुलुप तोडून साहित्याची चोरी व नासधूस केल्याचे मंगळवारी उघडकीस आले.
 
 
चोरट्यांनी वर्गातील पंखे, पुस्तके व महत्वाची कागदपत्रे इत्यादी साहीत्य चोरली तसेच शैक्षणिक साहित्याची नासधूस केली. शाळेतील बेंच, खिडक्या, लोखंडी ध्वजस्थंब, स्वच्छतागृहांचे दरवाजे, शौचालयाचे शिट, मुत्रालयाच्या भिंती याची तोडफोड करुन जिल्हा परिषद शाळेचे इमारतीचे नुकसान केले.
 
 
मागील तीन ते चार वर्षापासुन या शाळेच्या मैदाना मध्ये संरक्षण भिंतीच्यावरुन कचरा फेकणे तसेच शाळेच्या मैदानात प्रवेश करुन शौचास बसणे शैक्षणिक साहित्यांची तोडफोड व चोरी करणे, भिंतीवर अश्‍लील मजकूर लिहणे असा त्रास सुरु आहे, असे मुख्याध्यापक सैयद इकबाल सैयद फयाज्जोद्दीन यांनी सांगीतले. या आधी पंचायत समिती बोदवड गट शिक्षण विभाग व बोदवड पोलीस प्रशासन यांना वेळोवेळी तोंडी स्वरुपात तक्रार दिली असून याची कोणतीही दखल घेतली गेली नाही. गट शिक्षण विभाग आणि पोलीस प्रशासनाला लेखी तक्रारी करु असे मुख्याध्यापक यांनी सांगीतले.
 
उर्दू कन्या शाळेत पहिली ते सातवीपर्यंत शिक्षण घेणार्‍या ३७६ विद्यार्थीनी तसेच ९ शिक्षक, शाळेच्या आवारात घाणीचे साम्राज्य तसेच पिण्याच्या पाण्याचीही सोय नाही.
@@AUTHORINFO_V1@@