याद्यांमधील तांत्रिक अडचणी झाल्या दूर

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    03-Jul-2018
Total Views |

३ लाख ६५ हजार ७२ मतदार बजावणार मतदानाचा हक्क

 
 
जळगाव :
गेल्या पाच दिवसांपासून तांत्रिक कारणावरुन मनपाच्या सार्वत्रिक निवडणुकीत अंतिम प्रारुप मतदार यादी संदर्भात अडचण येत होत्या. सोमवारी, २ जुलै रोजी सायंकाळी तांत्रिक अडचण दूर झाल्यामुळे मतदार यादी मनपातील सर्व प्रभाग कार्यालय आणि प्रशासकीय इमारतीतील पहिल्या मजल्यावर प्रसिद्ध केली आहे़ निवडणुकीत ३ लाख ६५ हजार ७२ मतदार मतदानाचा हक्क बजावणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.
 
कर्मचारी रात्री उशिरापर्यंत होते थांबून
प्रारुप मतदार यादी प्रसिद्ध झाल्यानंतर अंतिम मतदार यादी २९ जून रोजी प्रसिद्ध केली जाणार होती़ परंतु संगणकावर तांत्रिक कारणावरुन समस्या आल्याने यादी प्रसिद्ध होऊ शकली नाही़ राज्य निवडणूक आयोगाच्या वेबसाईटवरच ही समस्या असल्याचे सूत्रांनी सांगितले़ त्यामुळे दररोज विविध राजकीय पक्षांचे उमेदवार मनपाकडे मतदार यादीबाबत विचारपूस करीत होते़ निवडणूक यंत्रणा या कामाला लागलेली होती़ रात्री उशिरापर्यंत कर्मचारी निवडणूक शाखेत थांबून होते़ आयुक्तांनी याबाबत राज्य निवडणूक आयोगाच्या वरिष्ठ अधिकार्‍यांशी चर्चा केली़ त्यानंतर ही समस्या अखेर दूर झाल्यामुळे अंतिम मतदार यादी प्रसिद्ध करण्यात आली़
मतदार यादीचा तिढा सुटला
निवडणूक आयोगाच्या सूचनेनुसार संपूर्ण प्रक्रिया पूर्ण झाली आहे. मतदार यादीत पुरुष मतदारांची संख्या १ लाख ९३ हजार ४०९ तर महिला मतदारांची संख्या १ लाख ७१ हजार ६३७ आहे़ इतर मतदारांमध्ये २६ जणांचा समावेश आहे़ अशी एकूण ३ लाख ६५ हजार ७२ मतदार संख्या आहे़ अंतिम मतदार यादीचा हा तिढा सुटल्यामुळे इच्छुक उमेदवारांनी मतदार यादी विकत घेण्यासाठी सोमवारी सायंकाळी उशिरा गर्दी केली असल्याचे दिसून आले.
 
प्रभागनिहाय वार्ड व पुरुष महिला मतदारांची
संख्या व केंद्रामधील मतदारांची संख्या याप्रमाणे
प्रभाग क्र.१ : पुरुष ९ हजार ६१४, महिला ८ हजार ५६९, इतर ११, केंद्रामधील निव्वळ मतदार १८ हजार १९४,
प्रभाग २ : पुरुष १० हजार ९००, महिला ९ हजार ८९७, इतर २,
प्रभाग ३ : पुरुष १०३६३, महिला ९३०९,
प्रभाग ४ : पुरुष १३१०५, महिला ११६५७,
प्रभाग ५ : पुरुष १४३३९, महिला १२८६४,
प्रभाग ६ : पुरुष ९९१६, महिला ८५७८,
प्रभाग ७ : पुरुष १००८४, महिला ९४४५,
प्रभाग ८ : पुरुष १०५९८, महिला ९२३०,
प्रभाग ९ : पुरुष ८६०५, महिला ७४७७,
प्रभाग १० : पुरुष १०३९३, महिला ९२९३,
प्रभाग ११ : पुरुष १२०२३, महिला ९२९३,
प्रभाग १२ : पुरुष ९६२७, महिला ८९७६,
प्रभाग १३ : पुरुष ९४६४, महिला ८४३२,
प्रभाग १४ : पुरुष १०९७७, महिला ९५०९,
प्रभाग १५ : पुरुष ८७८४, महिला ७३५६,
प्रभाग १६ : पुरुष १०६२२, महिला ९५६७,
प्रभाग १७ : पुरुष ८८८०, महिला ८१४०,
प्रभाग १८ : पुरुष ८८२८, महिला ७४५१,
प्रभाग १९ : पुरुष ६२७७, महिला ५२५७,
@@AUTHORINFO_V1@@