जळगाव महानगरपालिकेत कॉंग्रेस सक्षम पर्याय देणार

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    03-Jul-2018
Total Views |

प्रदेश सरचिटणीस विनायकराव देशमुख यांची माहिती

 
 
जळगाव :
जळगाव महानगरपालिका निवडणुकीबाबत जिल्हा निवड मंडळाची बैठक झाली असून, प्रदेश कॉंग्रेस समितीच्या ४ रोजी नागपूर येथे होणार्‍या बैठकीत अहवाल सादर केला जाईल. जळगावच्या राजकारणात सक्षम पर्याय देण्याचा कॉंग्रेसचा प्रयत्न राहील, असे प्रतिपादन पक्षाचे जिल्हा प्रभारी व प्रदेश सरचिटणीस विनायकराव देशमुख यांनी सोमवारी झालेल्या पत्रपरिषदेत केले.
 
 
देशमुख म्हणाले की, अनेकजण मनपाची निवडणूक कॉंग्रेसकडून लढविण्यास इच्छुक आहेत. राष्ट्रवादी कॉंग्रेस, आप, समाजवादी पक्ष व इतर समविचारींना सोबत घेण्याचा आमचा प्रयत्न आहे. मात्र, कॉंग्रेसला मानणारा मोठा वर्ग जळगावमध्ये आहे. तेथे पक्षाकडून तडजोड केली जाणार नाही. राष्ट्रवादी कॉंग्रेससोबत आघाडी करण्याबाबतचा अहवाल प्राप्त झाला असून, त्यावर लवकर निर्णय घेतला जाईल, असेही ते म्हणाले. १९ प्रभागात महिला आरक्षित जागांसाठी कॉंग्रेसकडे उमेदवार असल्याचे सहप्रभारी डॉ. हेमलता पाटील यांनी सांगितले. मनपा निवडणुकीत केवळ कॉंग्रेसच स्वच्छ चारित्र्याचे उमेदवार देईल, असा दावा प्रदेश सचिव डी. जी. पाटील यांनी केला.
 
 
नागपूर येथे प्रदेश कॉंग्रेस समितीची बैठक झाल्यानंतर पुन्हा एकदा जळगावला आढावा बैठक होईल. पक्षाची कुठेही फसगत होणार नाही यावर लक्ष ठेवले जात आहे. गोवा निवडणुकीनंतर सत्ता स्थापनेत पुरेशी काळजी घेण्यात पक्ष कमी पडला होता. आता तसे होणार नाही. या चुकांपासून पक्षाने धडा घेतल्याने कर्नाटकात कॉंग्रेस व मित्रपक्षाचे सरकार सत्तेत आले असल्याचा उल्लेख विनायकराव देशमुख यांनी केला. विधानसभेसाठी तयारी सुरू झाली असल्याचेही त्यांनी सांगितले.
@@AUTHORINFO_V1@@