संगणक ज्ञानाचे प्रमाणपत्र न देणे शासकीय सेवकांना भोवणार

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    03-Jul-2018
Total Views |



मुंबई: राज्य सरकारमधील गट ’अ’, गट ’ब’ व गट ’क’ मधील शासकीय सेवकाने संगणकाचे ज्ञानाचे प्रमाणपत्र सादर करण्यासाठी वेळोवेळी कालावधी वाढवून दिला होता. परंतु कित्येक सेवकांनी अद्‍याप प्रमाणपत्र सादर केले नाही. या कर्मचार्‍यांची वेतनवाढ रोखली जाणार आहे, असे आदेश राज्य सरकारने अधिसुचनेव्दारे दिले आहेत.

 

राज्य सरकारमधील गट ’अ’, गट ’ब’ व गट ’क’ संवगातील पदांवर नियुक्तीसाठी कर्मचार्‍यांना संगणकाचे ज्ञान आवश्यक आहे. याबाबत महाराष्ट्र नागरी सेवा नियम २५ जानेवारी १९९९ रोजी प्रसिध्द करण्यात आला होता.त्यानंतर वेळोवेळी याबाबत आदेश दिले होते. ८ मे,२०१८ च्या अधिसूचनेद्वारे सुधारणा करण्यात आली आहे. संगणक वापराबाबतचे ज्ञानाचे प्रमाणपत्र सादर न केले नाही त्यांची वेतनवाढ रोखण्यात यावी,पदोन्‍नती रोखण्यात यावी असे आदेश राज्य सरकारने दिले आहेत.

 

या सेवकांना दिलासा

ज्या शासकीय सेवकाने वयाची ५० वर्ष पुर्ण केली असेल त्यांना हे प्रमाणपत्र सादर करण्यापासून सुट मिळाली आहे. तसेच कोणत्याही शासकीय विभागात वाहनचालकांनाही यामध्येही सुट मिळाली आहे.

@@AUTHORINFO_V1@@