आषाढी वारीनिमित्त वाहतूक मार्गांमध्ये बदल

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    03-Jul-2018
Total Views |
  

 
 
पुणे :  आषाढी वारी अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपली आहे. यापार्श्वभूमीवर पुणे आणि पिंपरी- चिंचवडमध्ये पालखीच्या आगमनाच्या वेळी भाविकांना कसल्याही प्रकारची अडचण  निर्माण होऊ नये, स्थानिक  प्रशासन कामाला लागले आहे. संतश्रेष्ठ  ज्ञानेश्वर महाराज आणि संत तुकाराम महाराज यांचा पालखी सोहळा हा येत्या  ६ तारखेला रात्री पुणे मुक्कामी येणार आहे. तसेच ९ तारखेला सकाळी आपल्या मार्गाने रवाना होणार आहे. या दरम्यान शहरातील वाहतुकीला कसल्याही   प्रकारचा अडथळा निर्माण होऊ नये म्हणून पुणे पोलिस वाहतूक शाखेच्या वतीने वाहतूक व्यवस्थेत काही महत्वाचे बदल करण्यात आले आहे. यामध्ये अत्यावश्यक सेवेतील वाहने म्हणजेच अग्निशामक दलाच्या गाड्या, रुग्णवाहिका यासोबतच शहराबाहेर ये-जा करणाऱ्या वाहनचालकांनी पालखी मार्गाचा अवलंब न करता खाली दिलेल्या मार्गांचा अवलंब करावा असे आवाहन पुणे शहराचे वाहतुक शाखेचे पोलीस उपायुक्त अशोक मोराळे यांनी केले आहे.
 
मुंबईकडून सोलापूरकडे ये-जा करणाऱ्या वाहनांसाठी
 
  • तळेगाव येथून इंदूरी, चाकण, शिक्रापूर, वाघोली, केसनंद, कोलवाडी, थेऊर मार्गे सोलापूर रस्त्याने ये-जा करावी.
 
  • देहूरोड फाट्याने देहूरोड कात्रज बायपासने कात्रज जकातनाका सातारा रस्त्याने कापूरहोळमार्गे नारायणपूर, सासवड बाहेरून नारायणपूर फाट्यावरुन जेजुरी, मोरगाव, सुपा चौफुलामार्गे सोलापूरकडे ये-जा करावी.
 
मुंबईकडून नगरकडे ये-जा करणाऱ्या वाहनांसाठी
 
  • तळेगाव येथून इंदुरी, चाकण, शिक्रापूर, वाघोली मार्गे अहमदनगरकडे जावे.
 
सोलापूरकडून नगरकडे व नगर दिशेने सोलापूरकडे ये-जा करणाऱ्या वाहनांसाठी
  • सोलापूरवरून पुण्याकडे येणा-या व सोलापूरकडे जाणा-या सर्व वाहनांनी चौफुला येथून केडगाव, पारगाव, न्हावरे फाटा, नगररोड मार्गे पुण्याकडे यावे व उलट मार्गे सोलापुरला जावे.
 
 
साताराकडून सोलापूर व नगरकडे सोलापूरकडे ये-जा करणाऱ्या वाहनांसाठी
 
  • सोलापूर दिशेकडे जाण्यासाठी - कापुरहोळ मार्गे नारायणपूर, सासवड बाहेरून नारायणपूर फाट्यावरून जेजुरी, मोरगाव, सुपा, चौफुला मार्गे सोलापूरकडे ये-जा करावी.
 
  • नगरकडे जाण्यासाठी - कापुरहोळ मार्गे नारायणपूर सासवड बाहेरून नारायणपूर फाट्यावरून जेजुरी, मोरगाव, सुपा, चौफुला मार्गे सरळ केडगाव, पारगाव, न्हावरे गाव फाटा नगर रोडकडे ये-जा करावी.
 
 
पुण्याहून सासवडकडे जाणाऱ्या वाहनांसाठी
 
  • कात्रज सातारा रोडने कापुरहोळ, नारायणपूर मार्गे ये-जा करावी.
 
  • तसेच गोळीबार मैदान व मम्मादेवी चौकातून कोंढवा रस्त्याने सरळ लुल्लानगर, कोंढवा, बोपदेव घाट, सासवड बाहेरील नारायणपूर फाट्यावरून भिवरी, चांबळी या मार्गाचा वापर करावा.
 
 
तसेच यासंबंधी नागरिकांना काही अडचणी असल्यास त्यांनी वाहतूक शाखेच्या २६१२२००० किंवा २६२०८२२५ या क्रमांकांवर संपर्क साधण्याचे आवाहनही वाहतूक शाखेच्या वतीने करण्यात आले आहे.
 
@@AUTHORINFO_V1@@