''ज्यांच्या कार्यालयातच महिला सुरक्षित नाहीत, ते महिला सुरक्षेबद्दल काय बोलणार''

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    03-Jul-2018
Total Views |

 
 
 
नवी दिल्ली :  "काँग्रेस मोठ्या आवाजात महिला सुरक्षेबद्दल बोलते मात्र ज्यांच्या कार्यालयातच महिला सुरक्षित नाहीत ते महिला सुरक्षेबदद्ल काय बोलणार." अशी टीका भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय माहिती आणि तंत्रज्ञान विभागाचे प्रमुख अमित मालवीय यांनी केली. राहुल गांधी यांच्या कार्यालयातील एका महिला कर्मचारीने कार्यालयात लैंगिक अत्याचार झाल्याची तक्रार दाखल केली, त्या पार्श्वभूमीवर ट्विटरच्या माध्यमातून त्यांनी आपले मत व्यक्त केले.
 
 
 
 
काँग्रेस पक्षातील नेते, त्यांच्या कार्यालयात काम करणारे कर्मचारी स्वत: महिलांवर अत्याचार करतात आणि महिला सुरक्षेचे वक्तव्य करतात हा एक मोठा विरोधाभास आहे, असेही ते यावेळी म्हणाले. ज्या महिला काँग्रेस नेत्या पुढे येऊन महिला सुरक्षेविषयी बोलतात, त्यांनी आधी आपल्या स्वत:च्या सहकार्यांकडे लक्ष द्यावे असेही ते यावेळी म्हणाले.
 
 
 
 
काँग्रेसने नेहमीच महिला सुरक्षा विषयी मोठे मोठे वक्तव्य केले आहे. तसेच या सरकारच्या काळात महिला सुरक्षित नाही असे काँग्रेसने अनेकदा खडसावून सांगितले आहे, मात्र त्यांच्याच कार्यालयातील एका महिलेवर असे अत्याचार झाल्यामुळे काँग्रेसच्या महिला सुरक्षेविषयी असलेल्या धोरणांवर देखील मोठे प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहेत.
@@AUTHORINFO_V1@@