‘विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या आधारे संपत्तीनिर्मिती’

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    03-Jul-2018
Total Views |

उमवित १४ रोजी महत्त्वपूर्ण कार्यशाळा

 
जळगाव :
उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगाव आणि मराठी विज्ञान परिषद, मुंबई यांच्यातर्फे विख्यात अणुशास्त्रज्ञ डॉ.अनिल काकोडकर यांच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त शनिवार १४ जुलै रोजी ‘विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या आधारे संपत्तीनिर्मिती’ या विषयावर मान्यवरांचे मार्गदर्शन सत्र विद्यापीठाच्या सिनेट हॉलमध्ये होत आहे. खान्देशातील समृद्ध पण उपेक्षित निसर्गवैभव पाहता हे जाणकार तज्ज्ञांचे चर्चासत्र अनेक दृष्टीने नवीन दिशा आणि संधी देणारे ठरेल.
 
विद्यापीठात होणार्‍या या दिवसभराच्या कार्यक्रमास रचनात्मक व सेवात्मक कार्य करणार्‍या संस्था आणि महत्वाकांक्षी, संवेदनशील व्यक्ती तसेच संलग्न संबंधित संस्था प्रतिनिधींनी उपस्थिती द्यावी, असे आवाहन आयोजक मराठी विज्ञान परिषदेचे अध्यक्ष प्रा.जे.बी.जोशी आणि विद्यापीठाचे कुलगुरु प्रा.पी.पी.पाटील आणि सहकार्‍यांनी केले आहे.
 
 
तज्ज्ञांची मार्गदर्शनपर सत्रे
सकाळी १०.२५ ला विज्ञान गीत सादरीकरणाने प्रारंभ होईल. १०.३० ते ११ या वेळेत मान्यवरांच्या हस्ते उद्घाटन होईल. नंतरच्या सत्रात डॉ.गजानन डांगे (योजक, पुणे), प्रा.मिलिंद सोहोनी (आय.आय.टी.मुंबई), डॉ.विवेक सावंत (महाराष्ट्र नॉलेज कार्पोरेशन लि. अर्थात एम.के.सी.एल.पुणे) या तज्ज्ञांची मार्गदर्शनपर सत्रे होतील.
 
 
दुपारी १.३० ते २.३० या वेळात भोजन अवकाश असेल. नंतर डॉ.गिरीष सोहनी (भारतीय इन्स्टिट्यूट ऑफ ऍग्रो फाउंडेशन, पुणे), प्रा.जे.बी.जोशी (अध्यक्ष, मराठी विज्ञान परिषद, मुंबई) हे सत्र घेतील. नंतर डॉ.अनिल काकोडकर (राजीव गांधी सायन्स टेक्नॉलॉजी कमिशनचे अध्यक्ष) हे शेवटचे सत्र घेतील.
 
 
विद्यापीठात होणार्‍या या दिवसभराच्या कार्यक्रमास रचनात्मक व सेवात्मक कार्य करणार्‍या संस्था आणि व्यक्ती तसेच संलग्न संबंधित संस्था प्रतिनिधींनी उपस्थिती द्यावी, असे आवाहन आयोजक मराठी विज्ञान परिषदेचे अध्यक्ष प्रा.जे.बी.जोशी आणि विद्यापीठाचे कुलगुरु प्रा.पी.पी.पाटील आणि सहकार्‍यांनी केले आहे.
 
नियोजनासाठी ५ जुलैला बैठक
परिषदेचे सर्वेसर्वा अ.पां.देशपांडे (मुंबई) यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही. मात्र ५ जुलै रोजी या चर्चासत्रचे नियोजन आणि तपशिलाबाबत उमवित कुलगुरु प्रा.पी.पी.पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत सहकार्‍यांनी बैठक होणार आहे, अशी माहिती प्रा.एस.टी.बेंद्रे यांनी ‘तरुण भारत’ला दिली.
@@AUTHORINFO_V1@@