राणे-फडणवीस भेटीमागील नेमके गुपित काय ?

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    29-Jul-2018
Total Views |



मुंबई : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि खासदार नारायण राणे यांची आज मराठा आंदोलकांशी झालेल्या भेटीनंतर आता राज्यात एका नव्या चर्चेला तोंड फुटले आहे. मुंबईतील सह्याद्री अतिथीगृहामध्ये आज राणे आणि फडणवीस यांनी मराठा आंदोलकांच्या संयोजकांची भेट घेतली आहे. परंतु या संयोजकांची नावे मात्र सरकारकडून गुप्त ठेवण्यात आल्यामुळे या या गुप्तभेटीवरुन राज्यात नवी चर्चा सुरु झाली आहे.


विशेष म्हणजे या भेटीनंतर सरकारने याविषयी कसल्याही प्रकारची पत्रकार परिषद देखील घेतलेली नाही. तसेच पत्रकारांच्या प्रश्न उत्तरे देणे देखील सरकारने टाळले आहे. भेटीमध्ये झालेली चर्चा ही सार्वजनिक केली जाणार नसून संयोजकांची नावे देखील सुरक्षेच्या मुद्द्यावरून गुप्त ठेवण्यात आली असल्याचे सरकारकडून सांगण्यात आले आहे, त्यामुळे या भेटीमध्ये नेमक्या कोणत्या मुद्द्यांवर चर्चा झाली आहे, याविषयी अनेकांना प्रश्न निर्माण झाला आहे.


मराठा आंदोलनच्या पार्श्वभूमीवर राणे यांनी मराठा समाजाला आंदोलन मागे घेण्याची विनंती केली होती. सरकार मराठा आरक्षणासंबंधी पूर्णपणे सकारात्मक असून मराठा समाजाला न्याय जरुर दिला जाईल, असे राणेंनी म्हटले होते. त्यामुळे आज सकाळी राणे आणि फडणवीस यांची मराठा संयोजकांशी चर्चा केली होती. परंतु यासंबंधी पाळण्यात आलेल्या गुप्ततेमुळे ही बैठकी चर्चाचा विषय बनली आहे.
@@AUTHORINFO_V1@@