भेदभाव विरहित व्यवस्था उभारण्यावर अधिक भर : पंतप्रधान नरेंद्र

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    29-Jul-2018
Total Views |


 
लखनऊ : देशातील प्रत्येक नागरिकाला योग्य न्याय मिळावा, यासाठी म्हणून देशात भेदभाव विरहित व्यवस्था उभारण्यावर अधिक भर दिला जात आहे, असे वक्तव्य पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले आहे. उत्तरप्रदेशची राजधानी लखनऊ येथे विविध विकासकामांच्या उद्घाटनप्रसंगी आयोजित कार्यक्रमामध्ये ते आज बोलत होते.

'माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी हे नेहमी म्हणत कि, आपल्याला असा भारत घडवायचा आहे, त्यामध्ये गाव आणि शहर, केंद्र आणि राज्य सरकार आणि, प्रशासन आणि नागरिक यांच्यामध्ये कसल्याही प्रकारची दरी नसेल. देशामध्ये अशा प्रकारची व्यवस्था कार्यरत असेल जी प्रत्येका प्रती संवेदनशील असेल आणि कसल्याही भेदभाव करणार नाही. त्यामुळे सध्या भारत सरकार अशाच प्रकारची प्रशासकी व्यवस्था उभारण्यावर अधिक भर देत आहे, असे मोदींनी यावेळी म्हटले.



उत्तर प्रदेशच्या नागरिकांच्या हितासाठी केंद्र आणि राज्य सरकारने सुरु केलेल्या एकूण ८१ विकासकामांची पंतप्रधान मोदी यांचा हस्ते आज उद्घाटन करण्यात आले. एकूण ६० हजार कोटी रुपये इतके किमतीच्या या सर्व योजना असून यामुळे उत्तर प्रदेशच्या विकासला मोठ्या प्रमाणात चालना मिळणार आहे, असे मत यावेळी मोदींनी व्यक्त केले.




@@AUTHORINFO_V1@@