विदेशात तुमचा मित्र भारतीय दूतावास : सुषमा स्वराज

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    29-Jul-2018
Total Views |

 
 
नवी दिल्ली :  "परदेशात तुमचा मित्र म्हणून भारतीय दूतावास कार्य करेल, तुम्हाला काहीही मदत लागली तर भारतीय दूतावास त्यासाठी सज्ज असेल." अशी माहिती परराष्ट्र व्यवहार मंत्री सुषमा स्वराज यांनी दिली. ट्विटरच्या माध्यमातून त्यांनी हे सांगितले आहे.
 
 
 
 
परदेशात तुम्ही जर संकटात असाल तर त्वरित भारतीय दूतावासाशी संपर्क साधा, ट्विटरच्या माध्यमातून कळवा, भारतीय दूतावास तुमच्या मदतीसाठी सज्ज असेल असे स्वराज यांनी आज ट्विटरच्या माध्यमातून सांगितले आहे. आता पर्यंत ट्विटरच्या माध्यमातून स्वराज यांनी परदेशात अडकलेल्या अनेक लोकांचे प्रश्न सोडवले आहेत. तसेच भारतीय दूतावासाच्या माध्यमातून अनेक लोकांना संकटातून बाहेर काढले आहे.
 
याआधी देकील अनेक प्रकरणांमध्ये सुषमा स्वराज यांनी स्वत: लक्ष घालून भारताबाहेर असलेल्या भारतीय लोकांची मदत केली आहे. यापुढे देखील त्या असी मदत करतील असे आजच्या ट्वीट वरुन स्पष्ट झाले आहे.
@@AUTHORINFO_V1@@