पालिकेची ‘कल्याणाधार’ अनुदान योजना

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    29-Jul-2018
Total Views |



कल्याण : दिव्यांगांना स्वबळावर काहीतरी करता यावं यासाठी कल्याण-डोंबिवली महापालिकेच्यावतीने विशेष योजना तयार करण्यात येणार आहे. या कल्याणकारी योजनेअंतर्गत दिव्यांगांना पालिकेकडून अनुदान देण्यात येणार आहे. दिव्यांगांना थेट अनुदान देऊन स्वावलंबी होण्याचा पर्याय उपलब्ध करून देणारी कल्याण-डोंबिवली ही राज्यातील पहिली महापालिका असल्याचा दावाही पालिका प्रशासनाकडून करण्यात आला आहे.

 

उदरनिर्वाहासाठी दिव्यांगांना व्यवसाय किंवा उद्योगधंदे सुरू करण्यासाठी अनुुदान देण्यात येणार आहे. कल्याण-डोंबिवली महापालिका क्षेत्रात १७ हजार दिव्यांग व्यक्ती असल्याचे दिव्यांग महासंघाने जाहीर केले असून त्यांना नोंदणी करण्यासाठी पालिका प्रशासनाकडून वेळ देण्यात आला होता. या कालावधीत सुमारे १५ हजारांपेक्षा अधिक दिव्यांगांनी नोंदणी केली असून त्यांना उपलब्ध निधीनुसार व्यवसायासाठी अनुदान दिले जाणार आहे. मात्र दिव्यांगांनी व्यवसायासाठी अनुदान मिळावे यासाठी अर्ज करताना कोणता व्यवसाय करणार, याबाबतची संपूर्ण माहिती देण्याची अट घालण्यात आली आहे. व्यवसाय करण्यासाठी दिव्यागांना ५ लाखांच्या अनुदानाची मर्यादा घालून देण्यात आली असून ५ लाखांपर्यंत खर्च असलेला व्यवसाय करण्यासाठी ६० टक्के अनुदान यापुढे महापालिका प्रशासनाकडून देण्यात येणार आहे तर, उर्वरित ४० टक्के अनुदान कर्ज स्वरूपाने उपलब्ध करून घ्यावे लागणार आहे. अनुदानासाठी दिव्यांगांनी आपले अर्ज दाखल करावे, त्यानंतर अर्जाची छाननी करून पालिकेकडून अनुदान देण्यात येईल.

@@AUTHORINFO_V1@@