रेल्वेच्या तीनही मार्गांवर आज मेगाब्लॉक

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    29-Jul-2018
Total Views |

 
 
मुंबई : नेहमीप्रमाणे रविवारचा दिवस साधून मुंबई येथे रेल्वेच्या तीनही मार्गांवर मेगाब्लॉक लावण्याचा निर्णय रेल्वेकडून घेण्यात आला आहे. त्यामुळे रविवारी रेल्वेने प्रवास करणाऱ्या प्रवाशांचे मात्र हाल होणार आहेत. कुर्ला ते विद्याविहार स्थानकामध्ये पादचारी पुलाचा गर्डर उभारण्यासाठी शनिवार २८ जुलैला मध्यरात्री १२.३० ते आज रविवारी पहाटे ५.४० पर्यंत हा मेघा ब्लॉक घेण्यात आला. त्यानंतर आता मध्य, हार्बर आणि पश्चिम मार्गावर मेगाब्लॉकदरम्यान विविध कामे करण्यात येणार आहेत. यादरम्यान सर्व लोकल जलद मार्गावर धावणार आहेत.
 
 
 
 
मध्य रेल्वे :

विद्याविहार ते मस्जिद या स्थानकादरम्यान अप धिम्या मार्गावर आज सकाळी ११.२० ते दुपारी ४.०० वाजेपर्यंत मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. या मेगाब्लॉकदरम्यान सर्व लोकल अप जलद मार्गवरून धावतील. विद्याविहार ते सीएसएमटीदरम्यान लोकल कुर्ला, सायन, माटुंगा, दादर, परळ आणि भायखळा येथे थांबतील. या दरम्यान प्रवाशांना वरील स्थानकातून प्रवासाची मुभा देण्यात आली आहे. सीएसएमटी येथून सुटणाऱ्या सर्व जलद, अर्ध जलद लोकलला घाटकोपर, विक्रोळी, भांडूप, मुलुंड आणि दिवा स्थानकात थांबा देण्यात आला आहे.
 
हार्बर रेल्वे :

पनवेल ते वाशी स्थानकादरम्यान अप आणि डाऊन मार्गावर आज सकाळी ११.३० ते दुपारी ४.३० पर्यंत मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. या दरम्यान लोकल सेवा खंडित ठेवण्यात आली आहे. याचबरोबर ट्रान्सहार्बर मार्गावर ठाणे ते पनवेल मार्गावरही लोकल सेवा खंडित राहील.
 
पश्चिम रेल्वे : 

भाईंदर ते वसई स्थानकादरम्यान सकाळी ११.०० ते दुपारी ३.०० वाजेपर्यंत मेगाब्लॉक आहे. या कालावधीत विरार, वसई, ते भाईंदर, बोरिवलीपर्यंत सर्व लोकल धिम्या मार्गावर चालवण्यात येतील. तर काही लोकल रद्द करण्यात येतील.
@@AUTHORINFO_V1@@