विद्यार्थ्यांनो सुरक्षित वातावरणातून बाहेर पडून स्वत:च स्वत:चे मित्र व्हा : पंतप्रधानांच्या "मन की बात"

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    29-Jul-2018
Total Views |

 
नवी दिल्ली :  आता जुलैचा महिना सुरु झाला आहे. विद्यार्थ्यांचे लक्ष्य प्रश्नांपेक्षा कटऑफवर आणि घरापेक्षा हॉस्टेलवर अधिक असणार अशावेळेला विद्यार्थ्यांना मी केवळ एकच सांगू इच्छितो कि, "विद्यार्थ्यांनो सुरक्षित वातावरणातून बाहेर पडून स्वत:च स्वत:चे मित्र व्हा." असा सल्ला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विद्यार्थ्यांना दिला आहे. आज मन की बात या कार्यक्रमाच्या ४६ व्या भागात पंतप्रधान जनतेशी संवाद साधत असताना ते बोलत होते. यावेळी त्यांनी मध्य़प्रदेशातील एका गरीब विद्यार्थ्याची यशोगाथा देखील सांगितली.
 
 
महाराष्ट्रातील अजरामर संत परंपरा  : ज्ञानेश्वर महाराज, तुकाराम महाराज, संत एकनाथ, नामदेव महाराज, समर्थ रामदास असे अनेक संत महाराष्ट्रात होऊन गेले आहेत. त्यांनी अधश्रद्धेविरोधात लढण्याची प्रेरणा संपूर्ण जगाला दिली आहे. त्यांचे अभंग असू देत नाहीतर भारुड त्यांनी नेहमीच प्रेमाचा आणि सद्भावनेचा संदेश दिला आहे. त्यांच्या या संदेशाचे आपण सगळ्यांनीच पालन केले पाहिजे, असे त्यांनी म्हटले. नुकत्याच झालेल्या वारीच्या पार्श्वभूमीवर ते बोलत होते.
 
संतांसोबतच त्यांनी देशातील वीर जवान आणि देशासाठी मोठे कार्य केलेल्या दिग्गजांचे स्मरण केले तसेच २३ जुलै रोजी असलेल्या लोकमान्य बाळगंगाधर टिळक यांच्या जयंती आणि १ ऑगस्टला असलेल्या पुण्यतिथीच्या निमित्ताने त्यांचे स्मरण केले. टिळक यांच्या प्रयत्नांमधूनच सार्वजनिक गणेशोत्सवाची परंपरा सुरु झाली. त्याकाळी इंग्रजांविरुदेध एक होण्याची आवश्यकता होती, ते टिळकांमुळे शक्य झालं.
 
@@AUTHORINFO_V1@@