पंतप्रधान आज करणार मन की बात

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    29-Jul-2018
Total Views |

 
 
नवी दिल्ली : आज पंतप्रधान नरेंद्र मोदी मन की बातच्या कार्यक्रमाच्या माध्यमातून भारतीय जनतेशी संवाद साधणार आहेत. हा मन की बात कार्यक्रमाचा ४६वा भाग असणार आहे. सकाळी ११ वाजता ते संवाद साधतील. गेल्या महिन्याच्या कार्यक्रमात पंतप्रधानांनी खेळ आणि योगा यासंदंर्भात आपली मते व्यक्त केली होती. या महिन्याच्या कार्यक्रमात पंतप्रधान काय सांगतात या बद्दल जनतेला उत्सुकता आहे.
 
 
 
 
देशभरातून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना अनेक लोक सल्ले आणि महत्वाच्या बाबींविषयी माहिती पाठवतात त्याचा समावेश देखील यामध्ये नेहमीप्रमाणे करण्यात येणार आहे.
आजच्या कार्यक्रमात ते देशाची सद्य परिस्थिती, देश भरात साजरे करण्यात येणारे सण इत्यादीविषयी माहिती देतील, अशी शक्यता वर्तविण्यात येत आहे. हा कार्यक्रम ऑल इंडिया रेडियो (दूरदर्शन) आणि नरेंद्र मोदी मोबाईल अॅप्लिकेशनवर प्रसारित करण्यात येणार आहे. तसेच पंतप्रधान कार्यालय, माहिती व प्रसारण मंत्रालयाच्या युट्युब चॅनेलवर आणि डीडी न्यूजवर प्रसारित केले जाईल.
@@AUTHORINFO_V1@@