फुलण्याआधीच सुगंध...

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    29-Jul-2018
Total Views |

फुलण्याआधीच सुगंध...

निवडणुकीस केवळ तीन दिवस बाकी. प्रचाराची सगळ्याच पक्षांची जोरदार तयारी सुरू. कुणी सेलिब्रेटी आणतंय तर कुणी मंत्र्यांना आणतंय. जळगाव शहर अक्षरश: निवडणुकमय झालंय. बाजारात तर गुलाल अन् फटाक्यांची बी आवक वाढली म्हणता. पण मनपा निवडणुकीच्या शर्यतीत आघाडीवर दिसत्यात ते फक्त धनुष्यबाण अन् कमळ. दररोज एकमेकांवर परचारात कुरघोडी करताना दिसताय की ह्ये. गणपतराव पेपर वाचता वाचता एकदम थबकले.
 
 
‘आज तर गहजबच काम केलं म्हणायचं नाथाभाऊनं. आरं...कमळ उमलायच्या आदुगरच सुगंध आणला की ओ त्यायनं.’
ते हो कसं गणपतराव? आरं बाबा... ते समांतर रस्ता का काय म्हणता ना. ते मंजूर करून आणलं म्हणे नाथाभाऊनं. अन् येवढंच काय तर भुयारी मार्ग अन् उड्डाणपुलबी मंजूर केले म्हणे बाप्पा. समांतर रस्त्यासाठी १०० कोटी रुपये मंजूर केले म्हणे.
गणपतराव, भारीच काम झालं म्हणायचं हे तर! आरं बाबा नुसतं भारीच न्हाई, लय भारी म्हण, लय भारी. हा पण गणपतराव निवडणुकीच्या तोंडावर गाजर दाखवल्यागत वाटतय ह्ये. नाय का? आरं येडा का खुळा नार्‍या तू? ह्याच भाजपवाल्यानं निवडणुकीचं वारं नसतानाबी ईमानतळाचं, रस्ते रुंदीकरण अन् चौपदरीकरणाचं काम केलं न्हवं. अन् जळगाव-भुसावळ नवीन रेल्वे पट्रीचं काम कोणं सुरू केलतं, ईसरला बी का येवढ्यात? हाव हाव. तुमच्या म्हणण्यात तथ्य हाय. पण खरीच होईन कारं काम? हां मंग. होईन म्हंजी? व्हणारच. आरं गिरीशभाऊनं शबूद देलता. येका वरसात जळगावचा ईकास केला न्हाई तर पुन्यांदा मत मागायले यायचा न्हाय म्हणून. त्या माणसानं जे ठरवलं ते करूनच दावतो त्यो. आरं लेका जामनेर जाऊन तं बघ. चेहरा मोहरा बदलून गेलाय भाऊ गावाचा.
 
 
गणपतराव हे पटलं बघा तुमचं. पण काही लोकं म्हणता, की भाजपवाले फकस्त आश्वासनंच देता म्हणून. त्यायले तर चपराकच बसली की ओ ही. आता कसं बोलला नार्‍याभाऊ. हीच तर खासियत आहे ना भाऊ कमळाची. ना जातीवाद ना, ना समाजवाद फकस्त ईकासवाद करती ही मंडळी.
आता पक्याभाऊबी आले. या पक्याभाऊ.
 
 
गणपतराव नारायणराव, तुम्ही म्हणता ते समदं खरं हाय. पण एक गोष्ट ध्यानात ठेवाले पाहिजे आपन. जो खरोखर ईकास करत असन ना, त्याले संधी द्याया पायजे. दादानं काय कमी कामं केली हाय जळगावले. समांतर रस्ता येईन तव्हा जळगावचंच भलं होईन. उड्डाणपूल येईन तव्हा आपल्यालेच त्याचा फायदा होईन.
एलईडी लाईटं लागतीन, भुयारी मार्ग व्हतीन त्याचा फायदा आपल्या जळगावलेच होईन. अन् नही झालं त समदे या मंत्र्या-संत्र्यांयले गाळ्या देतीन. सगळं काही कराचं ते मंत्र्यायनंच. मंग साधं मतदान बी आपुन नको का करायले? लोकं मतदानालेच जाता नही बॉ.
 
 
यकदम बराबर बोललात पक्याभाऊ. अन् तुमाले माहिती हाये का? आपल्या जळगावमधी तो हैद्राबादवाला नही का, त्याचेबी उमेदवार उभे हाय म्हणता. त्याच्या पक्षाले ‘भारतमाता’बी चालत नही अन् ‘वंदे मातरम्’बी चालत नही भौ. आता तुमास्नी चांगलं ठाऊके ना गड्या त्याच्याबद्दल. त्याची माणसं कस काय निवडून येत्या? आहो सज्जन लोकायनं मतदान केलं नही तव्हाच अश्या लोकायचं फावतं नारायणराव. म्हणून त म्हणतोय. आधुगर समद्या लोकायनं मतदान करायले पायजे. मंग उड्डाणपूल होवो का न होवो. आपल्या जळगावातून ‘भारत माते’चा जयघोष बंद झाल्याबिगर नही राहायचा बॉ. तव्हा जर ईकास बी पायजे असन अन् जळगावची शान टिकवनं असन तर समद्या जळगावकरायनं मतदान करालेच पायजे.
- कल्पेश गजानन जोशी
Kavesh37yahoo.com
@@AUTHORINFO_V1@@