मागासवर्गीय आयोगाला लवकर निर्णय देण्याची विनंती : मुख्यमंत्री

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    29-Jul-2018
Total Views |

 
 
मुंबई : मराठा समाजाला लवकरात लवकर आरक्षण मिळावी, यासाठी मागासवर्गीय आयोगाला राज्य सरकारकडून विनंती करण्यात आली असून याविषयी लवकरच अंतिम निर्णय येईल, अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज दिली. मराठा क्रांती मोर्चाच्या संयोजकांशी झालेल्या भेटीच्या पार्श्वभूमीवर त्यांनी ही माहिती दिली आहे.
 
'मागासवर्गीय आयोग ही स्वायत्त संस्था असून सरकारला तिला आदेश देता येत नाही, तसेच तिच्या कार्यामध्ये हस्तक्षेप देखील करता येत नाही. त्यामुळे आयोगाला सरकारकडून विशेष विनंती करण्यात आली असून आयोग लवकरच आपला अंतिम अहवाल उच्च न्यायालयामध्ये दाखल करेल. यानंतर सरकार तत्काळ विधानसभेचे एक विशेष अधिवेशन बोलावून आरक्षणासाठी आवश्यक असलेल्या संवैधानिक बाबींची पूर्तता करेल, असे फडणवीस यांनी म्हटले आहे.


पोलिसांना मारहाण केलेल्यांवरील गुन्हे मागे नाही

याचबरोबर आंदोलन करत आहेत, म्हणून अटकेत असलेल्या सर्व मराठा तरुणांची सुटका करण्यात येईल, असे देखील फडणवीस यांनी सांगितले आहे. परंतु आंदोलनादरम्यान पोलिसांना ज्यांनी मारहाण केली आहे. अशा तरुणांवारचे मात्र गुन्हे मागे घेतले जाणार नाहीत, असे देखील त्यांनी स्पष्ट केले आहे.
 
 
सरकार सर्वांची चर्चेला तयार 
 
राज्य सरकार हे पहिल्यापासूनच मराठा आरक्षणाच्या बाजूने आहे. त्यामुळे मराठा समाजाने आजपर्यंत केलेली प्रत्येक मागणी सरकारने मान्य केली असून आपली भूमिका नेहमी स्पष्ट केलेली आहे. त्यामुळे भविष्यात जरी मराठा आंदोलकांना सरकारशी कसल्याही प्रकारची चर्चा करायची असेल, तर सरकार कायम चर्चेला तयार आहे, असे देखील फडणवीस यांनी यावेळी म्हटले आहे. 

 
@@AUTHORINFO_V1@@