ब्लॉगिंग : ऑनलाईन कमाईचे एक साधन

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    29-Jul-2018
Total Views |



ब्लॉगिंग म्हणजे नेमके काय? आणि ब्लॉगिंग कसे सुरू करावे? याबाबत आपण गेल्या आठवड्यात माहिती करुन घेतली. आज ब्लॉगिंगच्या माध्यमातून आपण पैसे कसे कमवू शकतो, याबद्दल थोडेसे जाणून घेऊया.

 

ब्लॉगिंगसाठी आपण आपली वेबसाईट निवडल्यानंतर काही महत्त्वाच्या किंवा प्रसिद्ध ब्लॉगर सर्व्हिस प्लॅटफॉर्म्सचा आपण आढावा घेऊया. असे ब्लॉगर सर्व्हिस प्लॅटफॉर्म वर्डप्रेस, ब्लोगर, मिडीयम, गुगल प्लस, क्वारा बऱ्यापैकी प्रसिद्ध आहे. ज्यावेळी आपण एकदा लिखाणाला सुरुवात करतो, आपल्याशी लोकं जोडली जातात, त्यानंतर लोकांना हवा असलेला आशय आपण एकदा द्यायला सुरुवात केली, तर आपल्याकडील व्हीजिटर्सची संख्यासुद्धा वाढते आणि मग ज्याप्रमाणे आपण गुगल एडसेन्सद्वारे कमवू शकतो, त्याचप्रमाणे ब्लॉगिंगद्वारे आपण पैसे कमवायला सुरुवात करू शकतो. आता त्यासाठी वेगवेगळ्या पद्धतीने डिजिटल मार्केटिंग केले जाते. त्याच्या वेगवेगळ्या पद्धती आपण बघूया.

 

यातील पहिले आहे ते जाहिरात नेटवर्क. म्हणजे ज्यावेळी आपण ब्लॉगिंग करायला सुरुवात करतो, त्यावेळी जाहिरातींद्वारे पैसा कमविणे हा एक प्राथमिक स्रोत असू शकतो. जगभरात याचा वापर केला जातो आणि भारतामध्ये सुद्धा ही पद्धत फार लोकप्रिय आहे, तर ज्यावेळेला तुम्ही तुमच्या ब्लॉगवरती कोणत्याही जाहिराती दाखवता किंवा जे तुमच्या ब्लॉगचे व्हीजिटर्स आहेत, त्यांनी जर त्या जाहिरातीवर क्लिक केले, तर कमिशनच्या रुपामध्ये आपल्याला पैसा मिळतो. आपल्या ब्लॉगवरती काम करताना अशा जाहिरातींची निवड आपल्याला करावी लागते, जी आपल्याला ब्लॉगवर प्रसिद्ध करायची आहे. आपण यात गुगल एडसेन्सचाही वापर करू शकतो किंवा यामध्ये आणखी इन्फोनिक्स आहे. ‘बिटवरटाईझरयांसारखे अन्य पर्यायसुद्धा उपलब्ध आहेत. आपण त्यांची जी जाहिरात आपल्याला हवी, त्याचे प्रकाशक व्हावे लागते आणि मग त्याची जी काही विस्तृत माहिती आहे जसे की, पैसा कसा येणार? किंवा कोणत्या खात्यात येणार? . त्यासंबंधित जाहिरातदाराला तुम्हाला मेल करावा लागतो अर्थात अर्ज करावा लागतो. जर तुमच्याकडे व्हीजिटर्सची संख्या जास्त आहे, तर तुम्हाला त्याच्याकडून प्रतिसाद मिळू शकतो. काही अॅलडकोड आपल्याला दिले जातील, जे स्वतःच्या ब्लॉगवरती लावावे लागतील आणि मग जो आपला टेक्स्ट विभाग आहे, त्यामध्ये आपण त्या जाहिराती दाखवू शकतो किंवा साईड बारवरती दाखवू शकतो. जितक्यावेळा ती जाहिरात लोक बघतील, तितक्या क्लिक्सवर आपण पैसा कमवू शकतो. आता हे प्रमाण अगदी 1- रुपयांपासून ते १०० -२०० -५०० -१००० -२००० पर्यंतही असू शकते. क्लिक्सवर मिळणाऱ्या मोबदल्याची संख्याही बदलत असते. एकूण व्हीजिटर्स किती आहेत? ती जाहिरात कोणत्या कंपनीची आहे? यावरही ही किंमतीची संख्या ठरते.

 

ब्लॉगचे मार्केटिंग

आता विपणन किंवा मार्केटिंग करून सुद्धा चांगला पैसा कमावता येऊ शकतो. इथे जी कोणती संबंधित वेगवेगळी उत्पादने आहेत किंवा वेगवेगळ्या ज्या काही सेवा असतात, त्या आपण प्रदर्शित करू शकतो. ज्या कोणत्या सेवांचा-उत्पादनांचा प्रचार आपल्याला करायचा आहे, त्यांची निवड आपल्याला विचारपूर्वक करावी लागते. त्यांच नीट संशोधन आणि विश्लेषण आपल्याला करावे लागते आणि मगच निवड करावी लागते. लक्षित वाचकवर्ग कोणता आहे? आणि आपला वाचकवर्ग कोणता आहे? याची माहिती घ्यावी लागते. ज्यावेळी त्या उत्पादन-सेवेच्या लिंक्सवरती आपले व्हीजिटर्स भेट देऊन खरेदी करतात, त्यावेळी त्या उत्पादनाकडून किंवा ती सेवा प्रदान करणार्या कंपनीकडून कमिशन स्वरुपात आपल्याला मोबदला मिळतो. अशा बर्याचशा कंपन्या आहेत जसे की, क्लिक बँक, इंडिया . असे काही मार्केटिंगचे नेटवर्क आहेत किंवा आपल्याकडे चांगल्या संख्येने व्हीजिटर्स असतील, तर फ्लीपकार्ट, अॅकमेझॉन यांसारख्या मोठ्या वेबसाईट सोबतसुद्धा आपण आपले संबंध प्रस्थापित करू शकतो. मग, त्यांना आपण मार्केटिंगसाठी अर्ज केल्यानंतर २४ ते ७२ तासांच्या आत तुमची माहिती बघून तुम्हाला त्यांच्या जाहिराती मिळतात किंवा मार्केटिंगचे काम मिळते किंवा नाकारले तरी जाते. एकदा जर ते मंजूर झाले, तर आपल्या खात्यातून मार्केटिंगच्या जाहिराती सुरु होतात. ते व्यवस्थित काम करत आहे की नाही, हे एकदा तपासून घ्यावे आणि त्यानंतर आपण त्यांच्या उत्पादनाची विक्री आपल्या ब्लॉगमधून करू शकतो. यामधील कमिशन वेगवेगळ्या कंपन्यांवरती अवलंबून असते. अगदी .५० टक्क्यांपासून ते अगदी ५० टक्क्यांपर्यंत आपल्याला कमिशन मिळू शकते. कोणते उत्पादन आहे त्यावरही हे अवलंबून आहे. जितके उत्पादन लोकप्रिय असेल, तितके मिळणारे कमिशन कमी असते. त्यामुळे काही अशी उत्पादनं बघावी लागतात, जी प्रसिद्ध नाहीत. पण, चांगली आहेत आणि त्यावर आपल्याला जास्त कमिशन मिळू शकते.

 

स्वतःच्या ब्लॉगवरून स्वतःच्या उत्पादनाची विक्री करणे, हा कमाई करण्यासाठीचा सर्वोत्तम मार्ग आहे, असे आपण म्हणू शकतो आणि हा मार्ग स्थिरदेखील आहे. कारण, आपला स्वतःचा व्यवसाय असल्याने तो किती विकसित करायचा? डिझाईन कसं करायचं? मार्केटिंग कसं करायचं? या साध्या गोष्टी आपण स्वतः ठरवू शकतो. आपण स्वतःचे वेगवेगळे उत्पादन उदा. पुस्तक, इलेक्ट्रोनिक वस्तू, -बुक, अशा वस्तूंची आपल्या ब्लॉगवर लिंक द्यायची. त्यापूर्वी आपल्या उत्पादनाची विक्री किंमत निर्धारित करावी लागते. उत्पादनाची विक्री कशी केली जाणार? त्याचे मार्केटिंग कसे करणार? आणि इंटरनेट बँकिंग, कार्ड पे, चेक याद्वारे पैसे घ्यायचे असल्यास ते ठरवावे लागते. त्यानंतर ब्लॉगवर त्यासंदर्भात लँडिंग पेज तयार करावे लागते, ज्यात आपल्या उत्पादनाविषयी पूर्ण माहिती उपलब्ध असते. मग त्या उत्पादनाची वैशिष्ट्ये, फायदे, ते कसे वापरावे हे सांगितले जाते. आपल्या ब्लॉगच्या किंवा उत्पादनाच्या प्रमोशनसाठी आपण -मेल मार्केटिंग/मेसेजद्वारे, सोशल मीडिया मार्केटिंग केलं, तरच आपण त्याद्वारे पैसे कमवू शकतो. किती खर्च करायचा? किती विक्री करायची? याचे ध्येय आपण ठरवू शकतो. जर टेक्नॉलॉजी विषयावर ब्लॉग असेल, तर त्याच संबंधित जाहिरात असणं आवश्यक आहे किंवा आहारासंदर्भात असेल, तर तशा जाहिराती हव्या.   ब्लॉगच्या माध्यमातून मुक्त व्यवसाय (फ्रीलान्सिंग) करताना आपण आपल्या ज्ञानाचा असा आर्थिकदृष्ट्या उपयोग करायला हवा. समजा, आपण बँकिंग क्षेत्रात आहोत किंवा टेक्नॉलॉजी क्षेत्रात आहोत, तर त्याचा प्रचार करायचा, नवीन लोकांना त्यासंबंधी सल्ला द्यायचा. लोकांना आपण नवीन ब्लॉग कसे सुरू करू शकतो, नवीन ब्लॉग कसे विकसित करू शकतात, त्याची माहिती द्यायची आणि त्याबदल्यात फी आकारायची. ज्या-ज्या गोष्टी आपण करू शकतो त्याची यादी तिथे द्यायची, लोकं संपर्क कसे करू शकतात, त्यासंदर्भात माहिती लोकांना द्यावी, पेमेंटची माहिती लोकांना द्यायला हवी आणि मग ज्याकाही वेगवेगळ्या माध्यमांची सेवा तुम्ही त्यांना देणार आहात, त्यासाठी तुमच्या ब्लॉगचे वाचक संपर्क करतील आणि मग जितके तुम्ही त्यात नैपुण्य मिळवाल, विशेषतज्ज्ञ व्हाल, तितके जास्त लोकं तुम्हाला संपर्क करतील.

 

स्वतःच्या ब्लॉगवर थेट जाहिराती करणं

बरेचसे ब्लॉगर स्वतःच्या ब्लॉगवर जाहिराती टाकतात. गुगलच्या एखाद्या संस्थेला जाहिरात देण्याऐवजी स्वतःच आपल्या जाहिरातीवर नियंत्रण ठेवायचं, लोकांकडून जाहिराती मिळवायच्या आणि त्या आपल्या ब्लॉगवर प्रकाशित करायच्या. फूटर, हेडर, साईड बार, पॉप-पॉप अशा वेगवेगळ्या जाहिराती इंटरनेटच्या माध्यमातून करता येतात आणि मग आपल्या ब्लॉगवर ‘advertise with us’ असे टाकून लोकांना आपल्या ब्लॉगवर जाहिरात देण्यासाठी आमंत्रित करायचं आणि मग लोकांना अॅपडस्पॉट आहेत, त्याचे दर सांगणे आवश्यक आहे. लोकांना नजरेत येईल, अशा ठिकाणी जाहिरात लावणे, हे देखील तितकेच महत्त्वाचे आहे. एकदा का जाहिरातीची किंमत ठरली की, मग आपण जाहिरात प्रकाशित करु शकतो आणि मग वेगवेगळ्या पद्धतीने पैसे कमवू शकतो.  भारतातील काही प्रसिद्ध online money making,jokes ब्लॉग प्रसिद्ध आहेत. व्हायरल न्यूज, पाककृती, आरोग्य, बँकिंग, डिजिटल टेक्नॉलॉजी हे असे काही प्रसिद्ध विषय आहेत, ज्यावर भारतात ब्लॉग लिहिले जातात आणि लोकांकडून त्याला खूप मोठा प्रतिसाद मिळतो. भाषेचा आपण इकडे उल्लेख करूया, भारतामध्ये इंग्रजी भाषेचं ज्ञान असणारे फार कमी लोकं आहेत आणि त्याच्यामुळे बरेचसे लोकं ऑनलाईनमध्ये त्यांच्या प्रादेशिक भाषेत किंवा हिंदी भाषेत त्यांना वाचायला आवडतं आणि त्यामुळे गेल्या काही वर्षांत प्रादेशिक भाषेतल्या ब्लॉग्समध्ये खूप मोठ्या प्रमाणावर वृद्धी झालेली आहे आणि त्यामुळे सर्वसामान्य लोकांना आपण त्यावर जोडू शकतो आणि तेच लोकं आपल्याला पुढे जाहिरातदार म्हणून सुद्धा मदत करू शकतात.  त्याचबरोबर लोकांना मदत करण्यासाठी सुद्धा आपण ब्लॉगिंगचा उपयोग करू शकतो, ज्यांना यासंदर्भात करिअर करायचं असेल त्यांना बरेचसे कोर्सेस उपलब्ध आहेत. हे स्वतः करा आणि स्वतः शिका. यामुळे अशा ब्लॉगिंग कोर्ससाठी खूप जास्त फी घेता कामा नये किंवा ज्यांना प्राथमिक माहितीसाठी ब्लॉगिंगचा कोर्स करायचा असेल, तर तो फायदेशीर आहे. अशा प्रकारे ब्लॉगिंग करता येतं आणि त्याद्वारे पैसासुद्धा कमावता येतो.

-प्रा. गजेंद्र देवडा

@@AUTHORINFO_V1@@