देशात बऱ्याच ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    28-Jul-2018
Total Views |
 
 
 
 
नवी दिल्ली : देशातील बऱ्याच राज्यात मुसळधार पाऊस पडण्याचा इशारा नुकताच हवामान खात्याने दिला आहे. भारतातील काही मोठ्या राज्यांमध्ये वादळी पाऊस येणार असल्याचे हवामान खात्याने सांगितले आहे. झारखंड, उत्तराखंड, अरुणाचलप्रदेश, नागालँड, मणिपूर, त्रिपुरा, पश्चिम बंगाल, बिहार, उत्तर प्रदेश, हिमाचल प्रदेश, हरियाणा, चंडीगड, दिल्ली आणि पश्चिम मध्य प्रदेश या राज्यांमध्ये जोरदार पाऊस पडणार असल्याचे सांगितले आहे. 
 
 
 
 
मागील काही दिवसांपासून संपूर्ण भारतात पावसाने चांगलीच हजेरी लावली होती. मुंबई, विदर्भ, पुणे येथे देखील चांगला पाऊस झाला मात्र आता पुन्हा एकदा भारतातील वरच्या राज्यांमध्ये मुसळधार पावसाची शक्यता सांगण्यात आली असल्याने नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. यावर्षी पाऊस चांगला झाला असे म्हणण्यात येत आहे. मात्र आता अजून पावसाची शक्यता सांगण्यात येत असल्याने वरील राज्यांमध्ये सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. 
 
 
 
@@AUTHORINFO_V1@@