आशोका धबधबा

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    28-Jul-2018
Total Views |


 

शहापूर : पावसाळा सुरू झाला की पर्यटकांची पावले आपोआपच विहीगांवच्या आशोका धबधब्याकडे ओढली जातात. कसार्यापासून साधारणत १२ किमी अंतरावर विहीगांव आहे. येथील लतिफवाडी येथे घाटातून हिरव्या वनराईतून वाट काढत लहानमोठे जलप्रवाह एकत्र येत एक मोठा जलप्रवाह होतो. त्यामुळे वाटेत येणाऱ्या दगडावरून हे पाणी आदळून होणारा पांढरा शुभ्र फेसाळणारा प्रवाह मंत्रमुग्ध करतो. या धबधब्यातील फेसाळलेला हा प्रवाह पाहण्यासाठी, डोहात मनसोक्त डुंबण्यासाठी पर्यटकांची येथे मोठा कुंभमेळाचा पहावयास मिळतो. त्यातच या धबधब्याला इको टुरिझमचा दर्जा मिळाल्याने ३२ लाख रूपये खर्च करून पर्यटकांच्या सुरक्षेसाठी विविध उपाय योजनण्यात आले आहेत.संरक्षक जाळया, सिमेटंचा प्लॅटफार्म, प्रथमोचार कक्ष, चेजिंग रूम, प्रसाधन गृहांची सुविधा आदी उपलब्ध केल्याने हा धबधबा आता अतिशय सुरक्षित झाला असल्याने अनेक पर्यटक कुटूंब, काफिल्यासह इथे वर्षा सहलीचा आंनद लुटण्यासाठी येतांना दिसतात. तर दुसरीकडे या धबधब्यावर अभिनेता शाहरुख खान व अभिनेत्री करिना कपूर यांच्या अशोका चित्रपटाचे चित्रीकरण झाले होते व याच धबधब्यावर या चित्रपटातील एक संपूर्ण गाणं चित्रित झालं आहे, म्हणून याला अशोक धबधबा हे नाव पडले.

 

मद्यपींवर लक्ष ठेवण्यासाठी चेक पोस्ट

मद्यपींवर लक्ष ठेवण्यासाठी पोलीस, वनाधिकारी यांच्यावतीने खास चेकपोस्ट उभारण्यात आले आहे. एखादा पर्यटक मद्यपान केलेल्या अवस्थेत आढळल्यास त्याला प्रवेश नाकारण्यात येतो. या शिवाय या धबधब्यालगत सिमेटचा स्वतंत्र प्लॅटफार्म उभारला असून संरक्षक जाळयादेखील बसविण्यात आल्या आहेत. महिला पर्यटकांसाठी चेंजिंग रूम , प्रथमोचार कक्ष तसेच आपत्कालीन यंत्रणा सज्ज ठेवण्यात आली आहे.

 

अशोका धबधबा पर्यटकांना साठी ठरतोय पर्वणी

शहापुर तालुका म्हटला कीआपल्या डोळ्यासमोर उभी राहते ती उन्हाळ्यातील भीषण पाणी टंचाई, हंडाभर पाण्यासाठी महिलांना करावी लागणारी भटकंती. परंतु पावसाळ्यात या ठिकाणी भटकंती दिसते ती म्हणजे निसर्गप्रेमी पर्यटकांची. कसारा घाटा हा अगदी डोळ्यांचे पारणे फेडणाऱ्या निसर्गसोंदर्यानी नटलेला असून येथील विहिगाव येथे ३० फुटांवरून जमिनीवर कोसळणारा अशोका धबधबा सध्या पर्यटकांसाठी आकर्षण ठरत आहे. या ठिकाणी शनिवार व रविवारी तर पर्यटकांची जत्रा भरलेली असते आणि या ठिकाणी जणू काही शाहीस्नानाची पर्वणीच पहावयास मिळते.

 

कसे जाल?

या ठिकाणी मुंबई, ठाणे, पुणे, कल्याण, नवी मुंबई, तसेच नाशिक, मालेगाव, येथून पर्यटक मोठ्या संख्येने येतात. मुंबईवरून या ठिकाणी येताना मुंबई-नाशिक महामार्गावरील शहापुर येथे यावे. नंतर येथून ३५ किलोमिटर अंतरावर असलेल्या कसारा घाटातून डाव्याबाजूला जव्हार फाट्या वरून २ किलो मीटर गेल्यावर विहिगाव येथे हा अशोका धबधब्यावर पोहचता येते. तसेच मध्ये रेल्वेच्या कसारा स्थानकावर उतरल्यास या ठिकाणी येण्यासाठी जीप, रिक्षा, तसेच एस.टी.महामंडळाच्या बसने पोहोचता येऊ शकते. तसेच या ठिकाणी साहसी पर्यटकांची संख्या देखील मोठ्या प्रमाणात असते, यात धबधब्याचे ट्रेकिंगचा समावेश आहे. वरून पडणाऱ्या शुभ्र धबधब्याचे पाणी आणि खालून दोनशे फुटावर दोराच्या सहाय्याने चढणारे ट्रेकर्स हा थरारदेखील पाहण्यासारखा असतो. तसेच याच धबधब्यावरून समोर असलेल्या महाकाय झाडाला खालीवर असे दोन रोप बांधून त्यावर चालून हा धबधबा क्रॉस करणे असे सहासी खेळ मुंबईतील काही संस्था ऑनलाइन नोंदणी करून पर्यटकांना अनुभवता येतात.

 

काय आहेत सुविधा

या ठिकाणी संपूर्ण देखरेख शहापूर येथील वनविभागामार्फत केली जात असून यात प्रामुख्याने वनव्यवस्थापन समिती या ठिकाणच्या पर्यटकांची काळजी घेत असते. पर्यटकांना मार्गदर्शन करणे, आलेल्या पर्यटकांच्या गाड्या पार्किंगची व्यवस्था पाहणे ही कामे वनव्यवस्थापन समितीद्वारे पाहिली जातात. तसेच या ठिकाणी घरगुतीजेवणाचा आस्वाद देखील घेता येऊ शकतो. येथील घरांमध्ये आपण जेवणाची ऑर्डर दिल्यास चुलीवरील शहाकारी व मांसाहरी जेवण मिळते.

 

- शिवाजी पाटील

 
@@AUTHORINFO_V1@@