पालिकेच्या विद्यार्थ्यांना केंब्रिज विद्यापीठाच्या अभ्यासक्रमाचे धडे मिळणार

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    28-Jul-2018
Total Views |


 

मुंबई : राज्य शासनाच्या मुंबईसह संपूर्ण महाराष्ट्रात, ‘प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र’, उपक्रमाअंतर्गत महापालिका शाळेतील विद्यार्थ्यांना आता जगभरात प्रसिद्ध असलेल्या केंब्रिज विद्यापीठाच्या अभ्यासक्रमानुसार शाळाबाह्य स्पर्धा परीक्षांसाठी शैक्षणिक धडे दिले जाणार आहेत. गणित, इंग्रजी, विज्ञान आणि फायनान्स ऑलिम्पियाडसाठी केंब्रिज विद्यापीठाच्या अभ्यासक्रमानुसार परीक्षेची तयारी करून विद्यार्थ्यांना परीक्षेला बसविण्यात येणार आहे.

 

तसेच प्रज्ञाशोध परीक्षेच्या व शिष्यवृत्ती परीक्षेच्या धर्तीवर अभ्यासक्रम तयार करून शाळांमधून राबविण्यात येणार आहे. मुंबई महापालिकेच्या शिक्षण विभागाकडून आठ माध्यमाच्या शाळा चालवण्यात येतात. गुणवत्ता विकास कार्यक्रमाअंतर्गत व विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास हाच हेतू लक्षात घेता विद्यार्थ्यांना शाळाबाह्य परीक्षेला बसविणे आवश्यक आहे. विद्यार्थ्यांची बुद्धिमत्ता तपासण्यासाठी आंतरराष्ट्रीय स्तरावरील परीक्षांचे आयोजन करण्यात येणार आहे. प्रोग्रॅम फॉर इंटरनॅशनल स्टुडंट असेसमेंट (पीआयएसए), प्रोग्रेस इन इंटरनॅशनल रीडिंग लिट्रसी स्टडी (पीआयआरएलएस)इंग्रजी भाषेकरिता, ट्रेण्डस् इन इंटरनॅशनल मॅथेमेटिक्स अॅण्ड सायन्स स्टडी गणित व विज्ञानासाठी, आंतरराष्ट्रीय फायनान्स ऑलिम्पियाड परीक्षा - आठवी व नववीकरिता, इंटरनॅशनल फायनान्स ऑलंम्पियाड, प्रज्ञा शोध परीक्षा याबाबत शैक्षणिक प्रशिक्षण देण्यात येणार आहे.पालिका शाळेतील विद्यार्थ्यांची शैक्षणिक प्रगती होण्यासाठी, पालिका शाळेतील शिक्षकांना संभाषणात्मक इंग्रजी भाषेवर प्रभुत्व मिळवण्यासाठी ‘इडुको’ या संस्थेकडून प्रशिक्षण दिले जाणार आहे.

 

तसेच ऑलिम्पियाड परिक्षेबाबत शिक्षक-मुख्याध्यापकांना प्रशिक्षण देणे, ऑलिम्पियाडच्या धर्तीवर निवडक विद्यार्थ्यांसाठी प्रशिक्षण वर्ग सुरू करणे, केंब्रिज विद्यापीठाच्या ऑलिम्पियाड व इतर बाह्य परीक्षांना बसण्याची फी भरणे, तिसरीपासून प्रज्ञा शोध परीक्षेच्या धर्तीवर अभ्यासक्रम, आवश्यकतेनुसार पुस्तके खरेदी करणे आणि त्यांचे वाटप करणे आदी बाबींसाठी शिक्षण समितीच्या आगामी बैठकीत तास सविस्तर माहितीपर प्रस्ताव मंजुरीसाठी सादर करण्यात येणार आहे.

@@AUTHORINFO_V1@@