लोकलमधून पडून दोघांचा मृत्यू

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    27-Jul-2018
Total Views |

 

मुंबई : जलद लोकलमधून थुंकण्यासाठी बाहेर डोकावताना तोल गेल्यामुळे दोन तरुणांना आपला जीव गमवावा लागला आहे. सरफराज समीर खान आणि अमीन सय्यद अशी या दोन तरुणांची नावे असून ते दोघे छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसला जाणाऱ्या लोकलमधून प्रवास करत होते.

 

या दोघांसोबत अजून एक मित्र प्रवास करत होता. त्याने दिलेल्या माहितीनुसार, सरफराज समीर खान, अमन सय्यद त्यांच्या मित्रांसोबत मुंब्र्याहून एका दर्ग्यात दर्शनासाठी जाणार होते. यासाठी त्यांनी मुंब्रा येथून स्लो लोकल पकडली मात्र नंतर घाटकोपर स्थानकावर उतरुन त्यांनी सीएसएमटीला जाणारी जलद लोकल पकडली. यादरम्यान सॅण्डहर्स्ट रोड रेल्वे स्थानकाजवळ सरफराज थुंकण्यास झुकला आणि त्याचा हाताचा तोल सुटून तो खाली पडला. यावेळी लोकलच्या दरवाज्यात उभा असलेला त्याचा मित्र अमन देखील त्याच्यासोबत तोल जाऊन खाली पडला.

 

या दुर्घटनेत सरफराज हा जागीच ठार झाला, तर अमन सय्यदला उपचारासाठी सेंट जॉर्ज रुग्णालयात दाखल करण्यात आलं होत मात्र उपचारादरम्यान डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. दरम्यान, लोकलमध्ये प्रवास करताना प्रवाश्यांनी चालत्या ट्रेनमधून बाहेर डोकावू नये या बाबत रेल्वेकडून वारंवार अवाहन करून देखील अपघाताची संख्या कमी होताना दिसून येत नाही.

@@AUTHORINFO_V1@@