पैसे भरूनही विद्यार्थ्यांना पास मिळेना!

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    27-Jul-2018
Total Views |


 

मुंबई : बेस्टने शालेय विद्यार्थ्यांच्या सोयीसाठी मुंबई शहर आणि उपनगरात विशेष बेस्ट बसेसची सोय केली आहे. शालेय विद्यार्थ्यांसाठी शाळांच्या वेळांनुसार विशेष बस सोडल्या जात असल्या तरीही काही भागांमध्ये सहा महिन्यांची रक्कम भरूनही त्यांना अद्याप एसटी पास मिळालेले नाहीत. त्यामुळे विद्यार्थ्यांना भुर्दंड बसत आहे. तसेच प्रवाशांना नवीन ’पास हवा असेल, तर एका महिन्यानंतर मिळेल,‘ असा बोर्ड वडाळा बस डेपोमध्ये लावण्यात आला आहे.
 

गणेश सिनेमा लालबाग ते राजा शिवाजी विद्यासंकुल, दादर या शालेय विद्यार्थ्यांच्या सोयीसाठी विशेष बस सेवा सुरू करण्यात आली आहे. या बससेवेसाठी रोज १०४ विद्यार्थी प्रवास करतात. या विद्यार्थ्यांनी सहा महिन्यांसाठी(जून ते नोव्हेंबर) एक लाख २६ हजार रुपये भरले आहेत. परंतु शाळा सुरू होऊन दीड महिना झाला आहे, तरीही विद्यार्थ्यांना पैसे भरूनही बसपासचे वितरण अद्याप करण्यात आले नाही आहे. त्यामुळे जे विद्यार्थी काही कारणास्तव शाळेत लवकर जातात किंवा शाळेतून उशिरा सुटतात, त्यांना शाळेपासून घरापर्यंत रोजचा नाहक भुर्दंड सहन करावा लागत आहे.

 

बेस्टच्या अधिकार्‍यांना विनंती केली आहे की, किमान शालेय विद्यार्थ्यांना पैसे भरलेल्या पावतीवर शाळा ते घरापर्यंत प्रवास करण्याची मुभा देण्यात यावी. परंतु बेस्टच्या मनमानी कारभारामुळे बेस्ट आणि ट्रायमॅक्सच्या वादात पैसे भरूनही विद्यार्थ्यांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे कृपया बेस्टने या वादावर लवकरात लवकर तोडगा काढण्याची विनंती विशेष बेस्ट बसचे समन्वयक संदीप परब आणि नरेंद्र कोरगावकर यांनी केली आहे.

@@AUTHORINFO_V1@@