शेअर बाजाराची उच्चांकी उसळी, मुंबई शेअर बाजाराने ओलांडली ३७ हजारांची पातळी

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    27-Jul-2018
Total Views |




वस्तू आणि सेवा कराच्या पहिल्या वर्षानंतरच्या पहिल्या तिमाहीच्या निकालांचा परिणाम

व्यापारी व गुंतवणूकदारांकडून सरकारच्या कामगिरीवर समाधान व्यक्त

अर्थव्यवस्थेला चालना देणाऱ्या निर्णयांमुळे सकारात्मक परिणामांची चर्चा

मुंबई : मुंबई शेअर बाजाराच्या निर्देशांकाने आज विक्रमी उच्चांकी पातळी गाठली. आज दिवसभरात शेअर बाजाराचा निर्देशांक ३५२ अंकांनी वधारला व निर्देशांकाने ३७ हजारांची पातळी ओलांडली. मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक आज दिवसअखेर ३५२.२१ अंकांनी वधारून बाजार ३७,३३५.८५ अंकांवर स्थिरावला.

विविध कंपन्यांचे वस्तू आणि सेवा कराच्या अंमलबजावणीनंतरच्या पहिल्या तिमाहीचे निकाल लागायला सुरुवात झाल्यामुळे बाजारात तेजी आली. तसेच अमेरिका व युरोप यांच्यात सकारात्मक व्यापारी वाटाघाटींच्या पार्श्वभूमीवर जागतिक शेअर बाजाराच्या वधारण्याचाही परिणाम भारतीय शेअर बाजारावर झाल्याचे दिसते. मुंबई शेअर बाजाराच्या निर्देशांकाचा उच्चांक ३६
,९८४.६४ इतका होता.

दुसरीकडे राष्ट्रीय शेअर बाजार अर्थात निफ्टी देखील तब्बल १११ अंकांनी वधारल्याचे पाहायला मिळाले. निफ्टीने देखील आज आपली उच्चांकी पातळी गाठली व बाजार १११.०५ अंकानी वाढून ११,२७८.३५ अंकांवर स्थिरावला. राष्ट्रीय शेअर बाजाराचा यापूर्वीचा उच्चांक ११,१६७.३० इतका होता. जागतिक बाजारात तसेच देशांतर्गत व्यापारात झालेल्या सकारात्मक वृद्धिमुळेच बाजारात तेजी आली असल्याचे बोलले जात आहे. शेअर बाजाराच्या कामकाजाचा आठवड्यातील हा शेवटचा दिवस असल्यामुळे बाजार उच्चांकी पातळीवर बंद झाल्याने गुंतवणूकदारांकडून समाधान व्यक्त करण्यात येत आहे.

@@AUTHORINFO_V1@@