पुणे महानगरपालिकेचा "अमृत पुरस्कारा"ने सन्मान

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    27-Jul-2018
Total Views |

पुणे स्मार्ट सिटीच्या शिरपेचात मानाचा तुरा

 
 
लखनऊ : लखनऊ येथे पार पडत असलेल्या अमृत (Atal Mission for Rejuvenation and Urban Transformation) च्या तिसऱ्या वर्धापनदिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात भारताचे गृहनिर्माण आणि शहरी व्यवहार राज्यमंत्री हरदीप सिंह पुरी यांच्या हस्ते पुणे महानगरपालिकेला "अमृत पुरस्कारा"ने सन्मानित करण्यात आले. तसेच यावेळी स्मार्ट सिटीज मिशन आणि पंतप्रधान आवास योजना यांच्याशी संबंधित प्रदर्शनाचे उद्घाटनही हरदीप सिंह पुरी यांच्या हस्ते करण्यात आले.
 
यावेळी पुणे शहराच्या महापौर मुक्ता टिळक यांनी महानगरपालिका अधिकारी आणि पुणे सिटी कनेक्सटह पुणे महानगरपालिकेने घेतलेल्या दीपगृह प्रकल्पाच्या थ्रीडी (3D) नमुन्याचे स्पष्टीकरण केंद्रीय मंत्री कुणाल कुमार, मिशन संचालक आणि इतर प्रतिनिधींना दिले.
 
 
 
अमृत योजनेमध्ये पुण्यात झालेल्या शहरी सुविधा ज्यामध्ये प्लेसमेकींग, दीपगृह प्रकल्प आणि बाइक शेअरिंग स्कीम यांच्यासाठी हा पुरस्कार पुणे महानगरपालिकेला देण्यात आला. महापौर मुक्ता टिळक, स्मार्ट सिटीचे मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र जगताप आणि पुणे महापालिका अधिकारी यांनी हा पुरस्कार स्विकारला.
 
 
 
 
@@AUTHORINFO_V1@@