मंत्रालय सुरक्षेसाठी आता ड्रोन कॅमेरे

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    27-Jul-2018
Total Views |


 

 

 
मुंबई: राज्याचे राजकीय-प्रशासकीय केंद्र म्हणजे राजधानी मुंबईतील मंत्रालय. या मंत्रालयाच्या सुरक्षेसाठी आता ड्रोन कॅमेर्‍यांचा वापर केला जाणार आहे. गेल्या काही महिन्यांमध्ये मंत्रालय आणि आसपासच्या परिसरात काही अनुचित प्रकार घडले होते. याच पार्श्वभूमीवर गृहविभागाकडून हा निर्णय घेण्यात आला आहे. शुक्रवारी मंत्रालय परिसरात ड्रोन कॅमेर्‍यांची चाचणीही करण्यात आली.
 

गेल्या काही महिन्यांमध्ये मंत्रालय परिसरात बरेच अनुचित प्रकार घडले. आता या प्रकारांना आळा घालण्यासाठी आणि मंत्रालयाच्या सुरक्षेसाठी गृहविभागाने मंत्रालय परिसरावर नजर ठेवण्यासाठी ड्रोन कॅमेर्‍यांची मदत घेण्याचा निर्णय घेतला आहे. शुक्रवारी याची पहिली चाचणी करण्यात आली. १५ ऑगस्ट आणि २६ जानेवारी या दोन दिवशी प्रामुख्याने ड्रोन कॅमेर्‍यांच्या मदतीने परिसरावर नजर ठेवली जाणार आहे. क्यूडीच कंपनीच्या साहाय्याने हे ड्रोन बसविण्यात आले असून जवळपास ५०० मीटरपर्यंतची अचूक दृश्ये याद्वारे टिपता येणार आहेत. दरम्यान, सुरक्षेच्या दृष्टीने मंत्रालय परिसरात अतिरिक्त १०० सीसीटीव्ही कॅमेरे लावण्याचा निर्णयदेखील घेण्यात आला आहे. तसेच मंत्रालयाजवळ संरक्षक भिंत उभारली जाणार असून या भिंतीवरदेखील सीसीटीव्ही कॅमेरे लावले जाणार आहेत. कंट्रोलरूमद्वारे घडणार्‍या घटनांवर नजर ठेवली जाणार असून यासाठी ६ पोलीस कर्मचारी तैनात केले जाणार आहेत. तसेच येत्या काळात मंत्रालयाच्या प्रवेशद्वारावर बॅरिअर लावण्यावरदेखील विचार सुरू असल्याची माहिती गृहविभागाकडून देण्यात आली.

@@AUTHORINFO_V1@@