दिल्लीमध्ये मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    27-Jul-2018
Total Views |
 
 


 
नवी दिल्ली : दिल्ली आणि महानगरीय क्षेत्रात गुरुवारपासून सुरु असलेल्या मुसळधार पावसाला आता ३० तास उलटून गेले आहेत, त्यामुळे तेथील जनजीवन विस्कळीत झाले आहे. या पावसामुळे तेथील रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात पाणी साचले आहे. तसेच हा पाऊस अजून एक दोन दिवस सुरु राहिल असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे.
 
 
 
 
 
 
दिल्लीसोबतच हिमाचल प्रदेश, जम्मू-कश्मीर, पंजाब, राजस्थान, मध्य प्रदेश, आसम, मेघालय, नागालॅँड, मणिपुर, मिझोरम आणि त्रिपुरा, पश्चिम बंगाल, छत्तीसगढ आणि झारखंड या राज्यांना देखील हवामान खात्याने सतर्कतेचा इशारा दिला आहे. त्याचबरोबर ग्रेटर नोएडा, नोएडा महामार्ग, गाझियाबाद, गुरुग्राम, फरीदाबाद या भागांनाही या पावसाचा मोठा फटका बसला आहे. या ठिकाणीही मोठ्या प्रमाणात पाणी साचले असून रस्त्यांना नद्यांचे रुप आले आहे. याचा सर्वात जास्त परिणाम तेथील वाहतूक व्यवस्थेवर होत असून जागोजागी वाहतूकीत अडथळे निर्माण होत आहेत.
 
 
 
 
@@AUTHORINFO_V1@@