देशभरातील डॉक्टर शनिवारी संपावर

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    27-Jul-2018
Total Views |


 

 

डोंबिवली : केंद्र शासनाच्यावतीने डॉक्टरांवर नॅशनल मेडिकल कमिशन लागू करण्यात येणार आहे. या विरोधात डॉक्टरांमध्ये तीव्र असंतोष पसरला असताना याच धर्तीवर शनिवारी देशभरातील सर्व डॉक्टर संपावर जाणार असल्याची माहिती इंडियन मेडिकल संघटनेच्या डोंबिवली शाखेच्या अध्यक्षा डॉ. अर्चना पाटे यांनी दिली.
 

हे विधेयक गरिबांच्या विरोधी असल्याने संसदेने मंजूर केल्यास सर्वसामान्यांचे डॉक्टर बनण्याचे स्वप्नदेखील केवळ स्वप्नच राहील, असे डॉक्टरांचे म्हणणे आहे. भारतातील सर्व राज्यांना समान संधी मिळावी, हे देशाच्या घटनेमध्ये नमूद आहे. मात्र नॅशनल मेडिकल कमिशनमध्ये एकाचवेळी ३ राज्यांना फक्त प्रतिनिधित्व दिले आहे. इतर राज्यांना आलटून पालटून प्रतिनिधित्व द्यावे हा अजब प्रकार आहे. हे सार्वभौम भारताच्या सांघिक समानतेच्या विरोधात आहे. संसदेच्या पावसाळी अधिवेशनात एनएमसी विधेयक सादर करून केंद्र सरकार हे विधेयक जबरदस्तीने लादण्याचा प्रयत्न करीत असल्याने त्याविरोधात शनिवारी दि. २८ जुलै रोजी दिवसभर देशभरातील वैद्यकीय व्यावासायिक रुग्णालये व दवाखाने बंद ठेवून केंद्र सरकारचा धिक्कार करणार असल्याचे डॉ. पाटे यांनी सांगितले.

@@AUTHORINFO_V1@@