भारतीय संस्कृतीला व्यासपीठ देऊ पाहणारी ओडिशाची ‘OTIA’

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    27-Jul-2018
Total Views |


 


‘OTIA’च्या कार्यक्रमासाठी ओडिशातील भुवनेश्‍वर, पूरी आणि कोणार्क या शहरांची निवड केली गेली असून तिथे कलाविषयक उपक्रमही राबविले गेले. मे २०१८ मध्ये भुवनेश्‍वर आणि नवी दिल्ली येथे ‘OTIA’चे अनावरण करण्यात आले.

 

अजिंठा-वेरुळच्या महाराष्ट्राला कला-सांस्कृतिक क्षेत्रात अत्यंत महत्त्वाचे स्थान आहे. महाराष्ट्रातील मुंबई ही देशाची आर्थिक राजधानी. मुंबईचा जागतिक आर्थिकतेवर परिणाम होतो, अशी अनेक उदाहरणे आहेत. या महाराष्ट्रात पुराणकाळापासून विविध स्थळांना-शहरांना राजधानीचं महत्त्व प्राप्त झालेलं होतं. पैठण, दौलताबाद, औरंगाबाद, वाशिम, पुणे ही शहरे पूर्वी वेगवेगळ्या घराण्यांच्या राजधान्या म्हणून परिचित होती. हे सारं चित्र व शिल्प कलांच्या जुन्या संदर्भावरून ध्यानात येते. हे सारं लिहिण्याचं प्रयोजन काय, असा प्रश्‍न वाचकांना पडू शकतो. हरकत नाही. खंत या गोष्टीची वाटते की, ‘कलाकारांची पंढरी’ अर्थात जहांगीर कलादालन मुंबापुरीत आहे. लहानमोठी पन्नास तरी दालने आणि खाजगी कलासंग्राहक मुंबईत आहेत. जास्तच असेल जरा हा आकडा. ‘सर जे. जे. स्कूल समूह,’ ज्याला दीडशे वर्षांहून अधिक कलावारसा लाभलेला आहे, असे महाविद्यालय मुंबईतच आहे. नेहरू सेंटर, नॅशनल म्युझियम, राष्ट्रीय कलादालन (NGMA ) आणि भरपूर काही... हे सारे मुंबईतच! जागतिक वारसा लाभलेल्या इमारती, ज्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराज रेल्वे स्थानकाची इमारत आणि इतर इमारती ज्यांना ‘पुरातत्व’ दर्जा आहे, हे सारे मुंबईतच! त्या मुंबईच्या महाराष्ट्राला महाराष्ट्रलक्षित कला अकादमी असायला हवी ना? त्याच महाराष्ट्राच्या कला संचालनालयाला समृद्ध बनवला पाहिजे ना? असं बरंच काही... आणि हा विषय निघण्याचं कारणही तसंच आहे.

 

ओडिशा या राज्याने म्हणजे त्या राज्यातील कलाकारांनी पुढाकार घेऊन एक त्रैवार्षिक कालावधीचा उपक्रम सुरू केला आहे आणि त्याचा शुभारंभ ओडिशात नव्हे, तर आपल्या मुंबईत झाला. दि. २१ जुलै २०१० ला जढखअ म्हणजे oooooodisha ‘triennial of international act’ चा शुभारंभ केला. हे ‘OTIA’ हे ‘ANPIC’ म्हणजे ‘Artists network for promoting Indian culture’ अशा उदात्त हेतूने ही संस्था कलाकार्य करणार आहे. भारतीय सांस्कृतिकतेला आणि भारतीय सांस्कृतिकतेवर कलाविषयक काम करणार्‍या चित्र व शिल्पकारांचे एक जाळे निर्माण करण्याचं काम ‘ANPIC’ करते आहे. त्याच अंतर्गत ‘OTIA’ काम करणार आहे, असे या संस्थेचे व्यवस्थापकीय विश्वस्त शशांका मोहापात्रा यांनी सांगितले. मात्र, या सार्‍यांहून अधिक यश ‘OTIA’ ला मुंबईतील दि. २१ जुलैला झालेल्या कार्यक्रमामुळे प्राप्त झाले, असे ओडिशावासी कलाकारांना वाटते. लोकसभेचे खासदार पिनाकी मिश्रा यांच्या प्रमुख उपस्थितीत हा कार्यक्रम झाला. त्यावेळी डॉ. शरयु दोशी (कलातज्ज्ञ), ज्येष्ठ चित्रकार प्रभाकर कोलते, ललिता लाजमी हे प्रतिष्ठीत कलाकर या कार्यक्रमामध्ये सहभागी होते.

 

या संस्थेचे स्लोगन- 3Cs म्हणजे ‘conceive contemplate communicate’ असे आहे. या संस्थेच्या उपक्रमांत विविध कलांविषयक शृंखला असणार आहेत. वेगवेगळी सत्र ज्यात विविध कलांविषयक तज्ज्ञ, फिल्म्स, थिएटर आर्टिस्टज, आर्ट, म्युझिक सादरीकरण कला आणि नवीनतम माध्यम कला या आणि अशा कलांचे प्रदर्शन आणि सादरीकरण याद्वारे केले जाणार आहे. खाजगी स्वरुपातील परंतु देश-विदेश पातळीवर भरारी घेऊ पाहणार्‍या ‘OTIA’ मध्ये मुंबईच्या सर जे. जे. स्कूल ऑफ आर्ट्सचे कला अध्यापक प्रा. रा. पाटील सहभागी आहेत. या उपक्रमातील ‘OTIA’ मध्ये मुंबई आणि मुंबईबाहेरील कला विद्यार्थी तसेच कला अध्यापकांसह महाराष्ट्रातील कलाकारांना व्यासपीठ मिळाले, तर खर्‍या अर्थाने ‘OTIA’चे कौतुक!

-प्रा. गजानन शेपाळ

@@AUTHORINFO_V1@@