दिग्गजांनी दिल्या कारगिल विजयाच्या शुभेच्छा

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    26-Jul-2018
Total Views |



नवी दिल्ली : काश्मीरप्रश्नावरून भारत आणि पाकिस्तान यांच्यात झालेल्या कारगिल युद्धाला (ऑपरेशन विजय) यंदा १८ वर्ष पूर्ण झाले आहेत. कारगिल विजयानिमित्त देशभरातून अनेक दिग्गजांनी भारतीय लष्कराला आणि नागरिकांना शुभेच्छा दिल्या आहेत.

राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी कारगिल विजय दिवसाच्या आठवणी जाग्या करत, भारतीय लष्कराच्या पराक्रमाचे कौतुक केले आहे. तसेच कारगिल युद्धामध्ये देशाला विजय मिळवून देण्यासाठी म्हणून आपल्या प्राणांची आहुती देणाऱ्या प्रत्येक जवानाचा आणि त्यांच्या कुटुंबियांचा प्रत्येक भारतीय नागरिक सदैव ऋणी आहे, असे गौरवोद्गार कोविंद यांनी काढले आहेत.



देशाचे उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांनी देखील कारगिल विजय दिवसाच्या आठवणीला उजाळा देत भारतीय सैनिकांच्या पराक्रमाचे कौतुक केले आहे.


दरम्यान कारगिल विजय दिनानिमित्त भारतीय लष्कराकडून जम्मू काश्मीरमध्ये आज विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. कारगिल जिल्ह्यामध्ये जवानांच्या स्मृतीप्रीत्यर्थ उभारण्यात आलेल्या विजयस्तंभाचे फुलांनी सुशोभीकरण करण्यात आले आहे. तसेच जम्मू-काश्मीरमधील नागरिक याठिकाणी येऊन विजयस्तंभाला आदरांजली वाहत आहेत.




काश्मीरवर वर्चस्व मिळवण्यासाठी म्हणून १९९९ च्या मे महिन्यामध्ये पाकिस्तान सैन्येने भारतावर हल्ला केला होता. जम्मू-काश्मीरमधील कारगिल जिल्ह्यासह आंतरराष्ट्रीय सीमेवर पाकिस्तानने हल्ले चढवले होते. तब्बल दोन महिने चाललेल्या या युद्धामध्ये भारतीय लष्कराने अतुलनीय शौर्य गाजवत तब्बल १२ फुट उंचीवरील द्रास, तोलोलिंग, काकसार आणि टायगर हिल या ठिकाणांहून पाकिस्तान सैनिकांना हुसकावून लावले होते. सरतेशेवटी २६ जुलै १९९९ मध्ये पाकिस्तानने आपला पराभव मान्य करत युद्धातून माघार घेतली.
@@AUTHORINFO_V1@@