मराठमोळ्या दिघेंचं कुटुंब बघितलं का?

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    26-Jul-2018
Total Views |

 
एका खिडकीतून घरात विसावलेले दिघे कुटुंब टि.व्ही. बघताना दिसतेय, त्या कुटुंबाची इवलीशी सदस्य साजरी दिघे आपल्याशी संवाद साधत तिला आवडणारा समुद्र, गोष्टी सांगणे आणि तिचे जगातील बेस्ट बाबा म्हणजेच माधव दिघे यांच्या आणि तिच्या आईबद्दल म्हणजेच कल्पना दिघे यांच्या विषयी तिच्या मनात असणारी थोडीशी भीती आणि प्रेमही ती बोलताना व्यक्त करते. तसेच सर्व प्रेक्षकांना ही गोड साजरी तिच्या कुटुंबाची गोष्ट बघण्यासाठी निमंत्रित करत आहे. अर्थात हा सगळा संवाद ती ‘परी हुँ मैं’च्या मोशन पोस्टर मधून आपल्याशी साधत आहे. आज प्रदर्शित झालेले मोशन पोस्टर बघून ही छोटी साजिरी नेमकी काय गोष्ट घेउन येणार याची प्रेक्षकांच्या मनात उत्कंठा निर्माण झाली आहे.
 
 
स्वरूप रिक्रीएशन्स अँड मिडिया प्रा. लि. प्रस्तुत आणि योगायतन फिल्मस निर्मित ‘परी हुँ मैं’ या मराठी चित्रपटाचे मोशन पोस्टर नुकतेच सोशल मिडीयावर रिलीज करण्यात आले. उर्जा, पोर्ट, रिअल इस्टेट, निर्यात, टाउनशीप आदी क्षेत्रात अग्रगण्य असलेल्या योगायतन ग्रुपचे प्रमुख डॉ. राजेंद्र प्रताप सिंह आणि शिला सिंह हे या चित्रपटाचे निर्माते असून संजय गुजर हे सहनिर्माते आहेत तर रोहित शिलवंत यांनी ‘परी हुँ मैं’ चे दिग्दर्शन केले आहे.
 
चित्रपट, टीव्ही मालिका, रियालीटी शो या चंदेरी दुनियेचा विषय लेखिका इरावती कर्णिक यांनी ‘वेगे वेगे धावू’ या एकांकिकेमधून मांडला होता, त्यावर आधारीत हा चित्रपट आहे. त्या एकांकिकेचे दिग्दर्शन अद्वैत दादरकर यांनी केले होते. तर ‘परी हुँ मैं’ या चित्रपटाची पटकथा मच्छिंद्र बुगडे, रोहित शिलवंत आणि संकेत माने यांची असून संवाद योगेश मार्कंडे यांचे आहेत. अभिनेते नंदू माधव, देविका दफ्तरदार, बालकलाकार श्रुती निगडे, फ्लोरा सैनी यांच्या प्रमुख भूमिका असलेल्या ‘परी हुँ मैं’ या चित्रपटातील अभिषेक खणकर आणि सचिन पाठक यांच्या गीतांना संगीतकार समीर सप्तीसकर यांनी संगीतबद्ध केले असून शंकर महादेवन, अमृता फडणवीस, जिया वाडकर आणि मंदार पिलवलकर यांचा स्वर गीतांना लाभला आहे. चित्रपटाला पार्श्वसंगीत अनुराग गोडबोले यांनी दिले आहे, ग्लॅमरस दुनियेची अत्यंत हटके सफर घडविणारा बहुचर्चित ‘परी हुँ मैं’ हा मराठी चित्रपट येत्या ७ सप्टेंबर रोजी संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणार आहे.
 
 
@@AUTHORINFO_V1@@