लाओसमध्ये धरण फुटले; १० हजार नागरिक बेघर

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    26-Jul-2018
Total Views |





अटॅप्यू (लाओस) :
दक्षिण लाओसमध्ये झालेल्या धरणफुटीमुळे तब्बल १० नागरिक बेघर झाले आहेत. यामध्ये आतापर्यंत ३० हून अधिक नागरिकांचा मृत्यू झाला असून शेकडो नागरिक अद्याप बेपत्ता आहेत. तसेच अद्याप ३ हजार नागरिकांना मदतीची गरज असून लाओस सरकारकडून नागरिकांच्या सुटकेसाठी प्रयत्न केले जात आहे.
लाओसच्या दक्षिण भागात कंबोडियाच्या सीमेजवळील अटॅप्यू प्रांतामध्ये ही घटना घडली आहे. अटॅप्यू प्रांतातील झे-नेमनॉय नदीवर असलेले हायड्रोपावर धरणाला गेल्या सोमवारी अचानक तडे गेल्यामुळे धरणफुटी झाली. त्यामुळे लाखो लिटर पाणी आजूबाजूच्या परिसरात आणि नदी पात्रामध्ये घुसले. परिणामी नागरिकांना सावध करण्याअगोदरच नदीपात्राजवळील सर्व गावांमध्ये पुराचे पाणी घुसल्याने अनेक घरांचे नुकसान झाले. तसेच अनेक जण वाहून गेले. काही नागरिकांनी घरांवर तर काहींनी झाडांवर आश्रय घेतल्यामुळे ते बचावले. यानंतर लाओस सरकारने तत्काळ नागरिकांच्या मदतीसाठी म्हणून प्रयत्न सुरु केले. आतापर्यंत एकूण २८०० नागरिकांची हा पुरामधून सुटका करण्यात आली असून आणखी ३ हजार नागरिक अद्याप पुरामध्ये अडकून पडल्याचे लाओस सरकारकडून सांगण्यात आले आहे.

दरम्यान सर्व परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात पाणी साठल्यामुळे मदत कार्यामध्ये मोठ्या प्रमाणात अडथळा निर्माण होत आहे. मोठ्या भूभागामध्ये पाणी जमा झाल्यामुळे मदत शिबिरे घटनास्थळापासून दूर अंतरावर उभारण्यात आली आहेत. त्यामुळे नागरिकांना मदत शिबिरांपर्यंत घेऊन जाण्यामध्ये अडथळा निर्माण होत आहे.
@@AUTHORINFO_V1@@