चीनमध्ये अमेरिकन दूतावासाबाहेर बॉम्बस्फोट

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    26-Jul-2018
Total Views |


बीजिंग : चीन राजधानी बीजिंग येथे आज सकाळी बॉम्बस्फोट झाल्याची घटना घडली आहे. विशेष आहे म्हणजे बीजिंगमधील भारत आणि अमेरिका या दोन देशांच्या दूतावासाबाहेरच हा स्फोट झाला असून आतापर्यंत या स्फोटामध्ये कसल्याही प्रकारची जीवित्त वा वित्तहानी झाल्याचे वृत्त समोर आलेले नाही.

भारत आणि अमेरिका या दोन्ही देशांच्या दूतावासाजवळच असलेल्या चौकामध्ये आज सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास हा स्फोट झाला आहे. सकाळच्या सुमारास याठिकाणी नागरिकांची रहदारी मोठ्या प्रमाणात असते. परंतु सुदैवाने यामध्ये अजूनपर्यंत कसल्याही प्रकारची हानी झाल्याचे समोर आलेले नाही. तसेच स्फोटाची तीव्रता देखील कमी असल्याचे काही प्रत्यक्षदर्शींकडून सांगण्यात येत आहे.

दरम्यान स्फोटानंतर संपूर्ण परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात धूर जमा झाला होता. त्यामुळे बीजिंग पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेत हा भाग काही काळासाठी बंद केला आहे. त्यामुळे नागरिकांना या ठिकाणापासून दूर जाण्याचा सल्ला देण्यात आला आहे. दरम्यान दूतावासातील नागरिकांच्या देखील सुरक्षेच्या देखील आढावा घेण्यात आला असून यास्फोटा मागील कारणांचा सध्या पोलीस शोध घेत आहेत.

@@AUTHORINFO_V1@@