२७ गावांना महापालिकेतून वगळण्याच्या मुख्यमंत्र्यांच्या निर्णयाचे स्वागत

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    26-Jul-2018
Total Views |



 

डोंबिवली : कडोंमपाच्या निवडणुकीदरम्यान महापालिकेत समाविष्ट झालेल्या २७ गावांना महापालिकेतून वगळण्याचा निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नागपूर अधिवेशनादरम्यान घेतला. त्यांच्या या निर्णयाचे २७ गाव संघर्ष समिती तसेच सर्वपक्षीय युवा मोर्चा समितीकडून स्वागत करण्यात आले. मात्र या निर्णयात काही शिवसेना नगरसेवक व पदाधिकारी खोडा घालण्याचा प्रयत्न करीत असल्याने त्यांच्या घरावर मोर्चा काढण्याचा इशारा या युवा मोर्चाच्या पदाधिकार्‍यांनी दिला. काल सकाळी अकराच्या सुमारास मानपाडा चौकात सर्वपक्षीय युवा मोर्चातर्फे निषेध नोंदविण्यात आला

मुख्यमंत्र्यांचा अवमान करणार्‍यांचा धिक्कार असो, भ्रष्ट महापालिकेची हाव धरणार्‍यांचा धिक्कार असो, या मजकुराचे कागदी फलक तसेच काही बोलकी व्यंगचित्रे हातात घेऊन व काळे कपडे परिधान करून उपस्थितांनी आपला निषेध नोंदविला. याप्रसंगी गणेश म्हात्रे, गजानन पाटील, संतोष केणे, रमेश म्हात्रेे, रवींद्र पाटील आदींसह मोठ्या संख्येने २७ गावांतील सर्वपक्षीय तरुण व नागरिक उपस्थित होते. यावेळी तीन वर्षे होऊनही काहीच विकास नाही उलट रस्ते, पिण्याचे पाणी, आरोग्य, कचरा या समस्या वाढल्या आहेत, अशी तक्रार नागरिकांकडून करण्यात आली.

@@AUTHORINFO_V1@@