दुसऱ्या दिवशीही मुंबई-पुणे महामार्गावर वाहतूक कोंडी

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    26-Jul-2018
Total Views |



पुणे : मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून सकल मराठा समाजाकडून पुकारण्यात आलेल्या ठोक मोर्चामुळे आज सलग दुसऱ्या दिवशी देखील मुंबई-पुणे महामार्गावर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली आहे. त्यामुळे महामार्गांजवळ मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला असून नागरिकांची गैरसोय टाळण्यासाठी म्हणून प्रयत्न केले जात आहेत.

ठोक मोर्चाच्या पार्श्वभूमीवर मराठा समाजाकडून आज मावळ बंदची हाक देण्यात आली आहे. त्यामुळे आज सकाळी मुंबई-पुणे द्रुतगती मार्ग आणि जुन्या मुंबई-पुणे महामार्गावर काही ठिकाणी आंदोलकांनी काही रस्ता रोको केला होता. यामुळे दोन्ही महामार्गांवर अनेक ठिकाणी पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. परंतु यामुळे महामार्गावर मात्र वाहतूक कोंडी झाली आहे. पोलीस जवान सध्या परिस्थितीवर नियंत्रण मिळवत असून वाहतुकी कोंडी फोडण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत.

दरम्यान काल देखील ठोक मोर्चामुळे मुंबई-पुणे महामार्गावर वाहतूक कोंडी झाली होती. मराठा आंदोलकांनी महामार्गावर आणि मुंबईमध्ये अनेक ठिकाणी रास्ता रोको केल्यामुळे काल दिवस महामार्गावरील वाहतूक ठप्प पडली होती. यामुळे सामान्य नागरिकांना मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागला होता.
@@AUTHORINFO_V1@@