नवी मुंबईतील इंटरनेट सेवा तात्पुरती बंद

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    26-Jul-2018
Total Views |

मराठा आरक्षण आंदोलन : कोपर खैरणे हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर इंटरनेट सेवा तात्पुरती बंद

 
 
 
नवी मुंबई : मराठा आरक्षण आंदोलनाचे लोण कालपासून कालपासून राज्यभरात मोठ्या प्रमाणात पसरले आहे. नवी मुंबईतील काल काही ठिकाणी जमावाद्वारे हिंसक घटना घडल्याच्या पार्श्वभूमीवर खबरदारीचा उपाय म्हणून नवी मुंबई परिसरातील इंटरनेट सेवा आज सकाळपासून बंद ठेवण्यात आली आहे. नवी मुंबईतील कोपर खैरणे भागात काल झालेल्या हिंसाचारानंतर हा निर्णय घेण्यता आल्याचे स्थानिक पोलिसांनी सांगितले.
 
 
नवी मुंबईतील कोपर खैरणे भागातकाल संध्याकाळी आंदोलन करणाऱ्या जमावाने वाहमांची तोडफोड केली होती तसेच स्थानिक नागरिकांच्या मालमत्तेचीही आंदोलकांनी जाळपोळ केली होती. तसेच आंदोलनकर्त्यांपैकी काहींनी पोलिस स्थानकालाही आग लावली होती. त्यामुळे या पार्श्वभूमीवर आज काही अनुचित घटना घडू नये व अफवा पसरून वातावरण चिघळू नये म्हणून ही इंटरनेट सेवा बंद करण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले.
 
 
मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी काल राज्यभर आंदोलन करण्यात आले होते व राज्यभर व्यापक बंद पुकारण्यात आला होता. कोपर खैरणे परिसरात आंदोलकांना बंद नंतर परत येत असताना स्थानिक नागरिकांच्या गाड्यांवर व दुकानांवर दगडफेक केली. त्यामुळे पोलिसांना नाईलाजाने सौम्य लाठिमार करावा लागला होता तसेच काही ठिकाणी अश्रूधुराच्या नळकांड्यांचाही वापर करावा लागला होता.
 
@@AUTHORINFO_V1@@