आयकर रिटन्स भरण्याचा मुदतीत ३१ ऑगस्ट पर्यंत वाढ

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    26-Jul-2018
Total Views |

 
 
नवी दिल्ली - आयकर भरणे हे देशातील प्रत्येक नागरिकाचे कर्तव्य आहे. तसे न केल्यास या नागरिकांना मोठ्या प्रमाणात समस्येला सामोरे जावे लागू शकते. मात्र यासाठी सरकार नागरिकांना मोठ्या प्रमाणात वेळ देखील देते. आयकर रिटर्न्स भरण्यासाठी आता सरकारने मुदतवाढ केली असून यामुळे आता नागरिकांना दिलासा मिळाला आहे. आता आयकर रिटर्न्स ३१ ऑगस्ट पर्यंत भरता येणार आहे.
 
 
 
 
ज्यांनी अद्याप इन्कम टॅक्स रिटर्न भरलेले नाही त्यांच्यासाठी ही अत्यंत आनंदाची गोष्ट आहे. केंद्र सरकारने वर्ष २०१यापूर्वी इन्कम टॅक्स रिटर्न भरण्याची अखेरची तारीख ३१ जूलै होती. मात्र आता सेंट्रल बोर्ड ऑफ डायरेक्ट टॅक्सकडून (सीबीडीटी) यात एक महिन्याची वाढ करण्यात आली.
त्यामुळे ३१ ऑगस्ट २०१८ पर्यंत इन्कम टॅक्स भरता येणार आहे. अर्थ मंत्रालयाने ट्विटरच्या माध्यमातून ही माहिती दिली आहे. २०१८-१९ साठी इन्कम टॅक्स रिटर्न भरण्याच्या तारखेत मुदतवाढ दिली आहे. त्यामुळे आता करदात्यांना ३१ ऑगस्टपर्यंत इन्कम टॅक्स भरता येईल.
@@AUTHORINFO_V1@@