मोदी सरकारच्या चार वर्षांत ३७०० नक्षलवादी शरण

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    26-Jul-2018
Total Views |

 (प्रातिनिधिक छायाचित्र)
 
 
नवी दिल्ली : गेल्या चार वर्षांच्या काळात देशभरात ३७०० हून अधिक नक्षलवाद्यांनी शरणागती पत्करली असल्याचे केंद्र सरकारने सांगितले आहे. केंद्रीय कौशल्य विकास आणि उद्योजकता मंत्री अनंतकुमार हेगडे यांनी काल राज्यसभेत प्रश्नोत्तराच्या तासात ही माहिती दिली. गृहमंत्रालयाच्या एका अहवालाचा दाखला देत गेल्या चार वर्षांत ३,७१४ नक्षलवादी शरण आले असल्याचे त्यांनी सांगितले.
 
 
या सर्व नक्षलवाद्यांकडे आयटीआय किंवा कौशल्य विकास प्रशिक्षण अभ्यासक्रामासाठी आवश्यक शैक्षणिक पात्र नव्हती. मात्र तरीही या सर्व नक्षलवाद्यांना कौशल्य विकास कार्यक्रमात प्रवेश मिळाला आहे. यासाठी केंद्र सरकारने प्रवेशाच्या अटी शिथील केल्याचे त्यांनी सांगितले. दरम्यान गेल्या तीन वर्षांत म्हणजेच २०१५ पासून जम्मू आणि काश्मीरमध्ये भारत-पाकिस्तान दरम्यान असलेल्या प्रत्यक्ष ताबा रेषेवरून येणाऱ्या ५८१ दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात आले असल्याची माहिती केंद्र सरकारने लोकसभेत काल दिली.
@@AUTHORINFO_V1@@