मुंबई, नवी मुंबई, ठाणे बंद आंदोलन स्थगित

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    25-Jul-2018
Total Views |


 


मुंबई : बंदला हिंसक वळण लागल्यानंतर सकल मराठा क्रांती मोर्चाने मुंबईतील बंद मागे घेत असल्याचे जाहीर केले असून समन्वयांकडून आंदोलकांना शांतता राखण्याचे आव्हान करण्यात आले आहे. सोबतच मुंबई, ठाणे आणि नवी मुंबईतील बंदचे आंदोलन स्थगित करण्यात आल्याचेही सांगण्यात आले. दरम्यान, राजकीय हेतूने बंद पेटवल्याचा संयोजकांनी संशय व्यक्त केला आहे.

 

लोकांना सुखरुप घरी जाता यावे म्हणून हा निर्णय घेतला असल्याचे सांगत, बंद स्थगित करण्यात आल्याचे मराठा क्रांती मोर्चाच्या समन्वयकांनी पत्रकार परिषदेत घोषणा केली. यावेळी बंद मध्ये सहभागी झालेल्या सगळ्यांचे आभार मानताना आयोजकांनी मराठा समाजाची गेली दोन वर्षे फसवणूक झाल्याचे सांगितले. त्यामुळे आता सरकारने आरक्षणासाठी आणखी वाट बघायला लावू नये असेही यावेळी संयोजकांकडून सांगण्यात आले.

@@AUTHORINFO_V1@@