मराठा समाजाबद्दल कसलेही बेजबाबदार वक्तव्य केलेले नाही : चंद्रकांतदादा पाटील

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    25-Jul-2018
Total Views |
 


मुंबई : मराठा समाजाबद्दल आपण कसल्याही प्रकारचे बेजबाबदार वक्तव्य केलेले नसून आपल्या वक्तव्याचा काही लोकांकडून चुकीचा अर्थ लावला जात आहे,' असे मत राज्याचे महसूलमंत्री चंद्रकांत दादा पाटील यांनी केले आहे. पाटील यांच्या 'पेड लोक' या वक्तव्यावर काल समाजामध्ये निर्माण झालेल्या वादंगावर त्यांनी सोशल मिडीयावरून आपली बाजू मांडली आहे.


मराठा समाजाला आरक्षण मिळावे, यासाठी हे सरकार पहिल्यापासूनच रोकठोक भूमिका घेत कार्य करत आहे. आरक्षण लागू करण्यासाठी म्हणून आवश्यक ते सर्व प्रयत्न राज्य सरकार करत आहे. परंतु आरक्षणाची बाब सध्या न्यायलयात असल्याने त्याबाबत काही वेगळा निर्णय घेणे या शासनाच्या हातात नाही. तरी देखील न्यायालयाच्या आदेशानुसार सरकारने राज्य मागासवर्ग आयोगाच्या अध्यक्षपदी दोन वेळा नियुक्त्या केल्या आहेत. तसेच मराठा समाजातील नागरिकांसाठी अनेक नवनवीन योजना देखील सरकारने सुरु केल्या आहेत, त्यामुळे सरकार मराठा समाजाच्या पाठीशी ठामपणे उभे असून मराठा समाजाच्या सर्व मागण्या पूर्ण केल्या जातील, असे पाटील यांनी म्हटले आहे.


याचबरोबर आपल्या वक्तव्याचे स्पष्टीकरण देत 'पेड लोक' हा शब्द आपण काही ठराविक लोकांसाठी वापरलेला असून याचा समस्त मराठा समाजाशी संबंध जोडू नये, असे त्यांनी म्हटले आहे. मराठा समाजाच्या आंदोलनामध्ये काही समाजकंटक लोकांकडून काही पेड आंदोलनकर्त्यांना पाठवण्यात आले आहे. जेणेकरून हे आंदोलन चिघळावे तसेच हिंसक व्हावे, परंतु मराठा समाजाने अशा लोकांना हेरून बाहेर काढणे गरजेचे आहे, तसेच आंदोलनादरम्यान नागरिकांनी आत्महत्येचा देखील प्रयत्न करू नये, असे आवाहन पाटील यांनी केले आहे.


@@AUTHORINFO_V1@@