अटल विश्वकर्मा योजना गरजवंतान पर्यंत पोचवा - विजय चौधरी यांचे नागपूरमध्ये आवाहन

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    25-Jul-2018
Total Views |
 
 
अटल विश्वकर्मा योजना गरजवंतान पर्यंत पोचवा - विजय चौधरी यांचे नागपूरमध्ये आवाहन

जळगांव , २५ जुलै 
असंघटित कामगारांच्या उज्वल भविष्यासाठी लाभदायी असलेल्या केंद्र सरकारच्या अटल विश्वकर्मा योजना प्रत्येक असंघटित कामगाराच्या घरात पोहचवण्याचे कार्य कार्यकर्त्यांनी करण्याचे आवाहन भाजपा ओबीसी मोर्चाचे महाराष्ट्राचे प्रदेशाध्यक्ष विजय चौधरी यांनी नागपूर येथे केले. महानगर भाजपा कार्यालयात मंगळवार २४ रोजी ओबीसी मोर्चाचा विभागीय समिक्षा बैठकित ते पदाधिका-यांना मार्गदर्शन करत होते.
 
 
या प्रसंगी व्यासपीठावर प्रदेश महामंत्री संयज गाते, प्रदेश उपाध्यक्ष किशोर पाटील, विदर्भ विभागीय अध्यक्ष सुभाष घाटे, ओबीसी मोर्चाचे ग्रामिण अध्यक्ष राजकुमार घुले, विना खानोरकर, वर्षा भदाडे, डॉ.अशोक भदाडे, राजु ठवरे, शहराध्यक्ष नाना उमाटे, सुनिल हिरणवार, प्रफुल्ल मोरे, सुनिल चीमोटे,प्रतिभा वैरागडे, सविता पाटणे, उषाताई शाहीवेले, श्रावण चव्हाण आदी उपस्थित होते.
 
 
या प्रसंगी विजय चौधरी यांनी आपल्या मार्गदर्शनात संवाद से संपर्क या अभियानाची सुरुवात नागपूर येथून करण्याचे गमक सांगतांना भूमी ही उर्जा भूमी आहे. केंद्रातील सरकार पंतप्रधान नरेंद्र मोदी व राज्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात ओबीसी समाजासाठी ज्या योजना राबवत आहे त्याची विस्तृत माहिती दिली.पक्षाच्या कार्यक्रमांची माहिती विभागस्तरावर देणे आवश्यक आहे. ओबीसी मोर्चाच्या पदाधिका-यांनी ओबीसी समाजात येणा-या 348 जातींच्या प्रत्येक समाजाशी व संघटनेशी संपर्क करुन त्यांच्या समस्या जाणून घेतल्या पाहिजे. त्या समस्यांच्या समाधानासाठी स्थानिक पातळिवर पालकमंत्री व राज्यस्तरावर आणि राष्ट्रीयस्तरावर केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या समोर मांडल्या जातील . कार्यकर्त्यांनी त्रिसुत्रीय कार्यक्रम राबवावा यात केंद्र सरकारची अटल सन्मान योजनेची माहिती असंघटित व सामान्य कामगारांपर्यंत पोहचविणे आवश्यक आहे. या योजनेंतर्गत या कामगारांच्या जीवनाला नवीन दिशा मिळणार आहे. केवळ 85 रुपये नोंदणी शुल्क भरुन नोंदणी केली जाणार आहे. नोंदणी केलेल्या कामगारांच्या बँक खात्यात 5 हजार रुपये आर्थिक मदतीसोबत विविध 28 योजनांचा लाभ त्यांना मिळणार आहे.
 
 
ओबीसी समाजअंतर्गत 348 जातींच्या मतदारांची विधानसभाक्षेत्रनिहाय माहिती, समाजाच्या अंतर्गत संघटन आणि संस्था पदाधिका-या समवेत चर्चा , केंद्र व राज्य सरकारच्या योजनांचा लाभ घेतलेल्या लाभार्थींपर्यंत पोहचुन त्यांचे व्हीडिओ बनवुन जनतेत पोहचविण्याचे कार्य करण्याच्या सुचना विजय चौधरी यांनी कार्यकर्त्यांना केल्या.केंद्र व राज्य सरकारच्या योजना सामान्य लोकांपर्यंत पोहचविण्याचे आवाहन त्यांनी कार्यकर्त्यांना केले. या प्रसंगी विविध राजकिय पक्ष आणि समाजाच्या महिला पदाधिका-यांनी त्यांच्या समर्थकांसह विजय चौधरी यांच्याहस्ते भाजपा प्रवेश केला.

 11 दिवसांचे हे अभियान असून याची सुरवात नागपूर विभागापासून झाली आहे.या अंतर्गत भंडारा, गडचिरोली, चंद्रपुर, अकोला, अमरावती, वाशिम, यवतमाळ, वर्धा, हिंगोली , नांदेड, परभणी, जालना, बीड व औरंगाबा येथे जावून पदाधिकारी व कार्यकर्त्यांशी संवाद साधुन आढावा घेतला जाणार आहे.

 शासनाच्या योजना गरजवंतापर्यंत पोहचविण्याच्या कार्यकर्त्यांना सुचना
अटल विश्वकर्मा योजना असंघटित कामगारांपर्यंत पोहचविणार

85 रुपये भरुन नोंदणी, नोंदणी करताच 28 योजनांचा लाभ
ओबीसी समाज संघटित करण्याचे कार्य जोमाने
 शासकिय योजनांचा लाभ ख-या गरजवंतांना मिळावा यासाठी विशेष प्रयत्न

 
 
@@AUTHORINFO_V1@@