मराठा आंदोलनाला माझा पाठिंबा : रामदास आठवले

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    25-Jul-2018
Total Views |

 
 
 
नवी दिल्ली :  "मराठ्यांनी पुकारलेल्या आंदोलनाला माझा पाठिंबा आहे. आरक्षणाची मर्यादा ५० % हून वाढवून ७५ % करण्यात यावी." अशी मागणी सामाजिक न्याय मंत्री रामदास आठवले यांनी केली आहे. मराठा आंदोलनाला त्यांनी पाठिंबा दर्शविला असून मराठ्यांनी शांतपणे आंदोलन करावे असे त्यांनी म्हटले आहे.
 

आरक्षणाच्या मागणीच्या पूर्ततेसाठी घटनादुरुस्तीची आवश्यकता :

मराठ्यांना आरक्षण मिळावं यामध्ये काहीच गैर नाही, मात्र आरक्षणाच्या मागणीच्या पूर्ततेसाठी घटनादुरुस्ती होणे आवश्यक आहे, असेही ते यावेळी म्हणाले. मराठा आरक्षणाबद्दल आपले काय मत असे असे विचारले असता, त्यांनी माध्यमांशी संवाद साधताना आपले मत व्यक्त केले.

 
आज मराठा समाजाने आरक्षणाच्या मागणीसाठी मुंबई, नवी मुंबई, ठाणे, पालघर आदी परिसरात बंद पाळला आहे. तसेच हे आमचे शेवटचे शांततापूर्ण आंदोलन असेल असाही इशारा त्यांनी दिला असून सरकारवर दबाव बनविण्याचा प्रयत्न केला आहे, तर दुसरीकडे ''सरकारने आरक्षण दिले आहे, मात्र त्याला उच्च न्यायालयाने स्थगिती दिली असून आता यावर न्यायालयच निर्णय घेऊ शकेल." असे वक्तव्य राज्याचे शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी केले आहे. त्यामुळे आता पुढे काय होते हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.
@@AUTHORINFO_V1@@