आफ्रिकन देश भारतासाठी महत्वाचे देश : नरेंद्र मोदी

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    25-Jul-2018
Total Views |
 
 
 
 
कंपाला : युगांडा समवेत आफ्रिकन देश हे भारतासाठी महत्वाचे देश आहे असे मत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केले आहे. काल युगांडामध्ये भारतीय समुदायाला संबोधित करतांना ते बोलत होते. आपल्या तीन देशांच्या दौऱ्यावर नरेंद्र मोदी गेले असतांना काल ते युगांडा येथे ते उतरले यावेळी त्यांनी युगांडामधील प्रमुख नेत्यांशी आणि भारतीय नागरिकांची भेट घेतली. 
 
 
 
 
युगांडामध्ये भारतीय समुदाय मोठ्या प्रमाणात आहे, दोन्ही देशांपुढील समस्या एकसारख्या आहेत तसेच दोन्ही देशांनी गुलामी एकसारखी सहन केली आहे म्हणून भारतासाठी आफ्रिकन देश हे महत्त्वपूर्ण आहेत कारण दोन्ही देश हे एकाच समस्येतून गेले आहेत अशी माहिती नरेंद्र मोदी यांनी दिली. 
 
 
 
 
सध्या मेक इन इंडिया हे संपूर्ण जगापर्यंत पोहोचत आहे. भारत काही वर्षांपूर्वी दुसऱ्या देशांकडून वस्तू आयात करत होता मात्र आता भारत त्याच देशांना वस्तूंची निर्यात करत आहे त्यामुळे भारत काय आहे हे जगाला समजत असून भारताच्या वस्तूंचा दर्जा देखील जगाला कळत आहे. युगांडामध्ये मेक इन इंडियाच्या आधारावर तुम्ही जर स्मार्ट फोन घेतले तर तुम्हाला भारताचा दर्जा कळेल असे देखील नरेंद्र मोदी यावेळी म्हणाले. 
 
 
आफ्रिकेच्या सामाजिक आणि आर्थिक संघर्षात तर भारताने आफ्रिकन देशांना मदत केली आहे. त्यामुळेच ‘आफ्रिकन विकास बँकेची’ वार्षिक बैठक मागील वर्षी भारतात आयोजित करण्यात आली होती. व्यापार, आर्थिक, सामाजिक आणी तंत्रज्ञान या क्षेत्रामध्ये भारत आणि युगांडा एकमेकांना सहायता करणार आहे अशीही माहिती त्यांनी यावेळी दिली.
 
 
 
@@AUTHORINFO_V1@@