नव्या ठाणे रेल्वे स्थानकाच्या कामाला वेग

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    25-Jul-2018
Total Views |



ठाणे : नवीन रेल्वेस्थानकाच्या निर्मितीसाठी मेंटल हॉस्पिटलची १४ .८५ एकर जागा महापालिकेला हस्तांतरित करण्याच्या प्रक्रियेला नुकतीच मंत्रिमंडळाची मंजुरी मिळाली. त्यामुळे आता हे काम जलदगतीने मार्गी लावण्यासाठी खा. राजन विचारे यांनी बुधवारी रेल्वे प्रशासन व महापालिका अधिकारी यांच्याशी याविषयी सविस्तर चर्चा केली. या बैठकीला खा. राजन विचारे, मध्य रेल्वेचे मुख्य प्रशासकीय अधिकारी एस. के. तिवारी, मुख्य अभियंता तसेच महापालिकेचे कार्यकारी अधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

या बैठकीत प्रामुख्याने नवीन रेल्वेस्थानकाचे पादचारी पूल फलाटावरील छत, नाल्यावरच पूल यांचे संकल्प चित्र महापालिकेने नेमलेल्या सल्लागारांमार्फत तयार करण्याचे आदेश रेल्वे प्रशासनाने दिले. त्याचबरोबर या नियोजित रेल्वेस्थानकाच्या प्रकल्पासाठी १४ .८५ एकर जागेची संपूर्ण जमिनीचा माती परीक्षण अहवाल तयार करण्यास सुरुवात करावी, असे आदेशही देण्यात आलेे. आराखड्यातील सर्व फेरफार महिन्याभरात पूर्ण करावे, असे आदेश खा.राजन विचारे यांनी रेल्वे प्रशासन व महापालिका प्रशासन यांना दिले.

@@AUTHORINFO_V1@@