मराठा समाजाला आरक्षण देणे आमचा 'पॉलिटिकल अजेंडा' नाही, तर 'कमिटमेंट' आहे : चंद्रकांत पाटील

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    25-Jul-2018
Total Views |

 
 
मुंबई : मराठा समाजाला आरक्षण देणे म्हणजे काही आमचा 'पॉलिटिकल अजेंडा' नाही, तर समाजाला आम्ही समाजाला दिलेली 'कमिटमेंट' आहे, आणि आम्ही ते नक्कीच पूर्ण करु. अशी माहिती राज्याचे महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिली. आज मराठा क्रांती मोर्च्याने काही ठिकाणी हिंसक वळण घेतले त्या पार्श्वभूमीवर माध्यमांनी त्यांच्याशी संवाद साधला त्यावेळी ते बोलत होते.
 
 
 
 
गेल्या दोन वर्षांपासून रात्रंदिवस आम्ही झटत आहोत :

आम्ही मराठा समाजाला दिलेले आश्वासन पूर्ण करण्यासाठी गेली दोन वर्षे रात्रंदिवस झटत आहोत. मराठा समाजाविषयी आम्हाला देखील काळजी आहे, असेही ते यावेळी म्हणाले.
 
माझ्या वक्तव्याचा विपर्यास करण्यात आला :

मराठा क्रांती मोर्च्यांची दखल संपूर्ण देशानी घेतली आहे, अशा वेळी 'काही लोक' या आंदोलनाला हिंसक वळण देण्याचे प्रयत्न करत आहेत, अशा लोकांपासून मराठा नेत्यांनी सावध रहायला हवे, असे वक्तव्य मी केले होते. मी सर्वच मराठा कार्यकर्त्यांवर आरोप करत नाहीये, मात्र काही लोकांविषयी मी हे मत व्य़क्त केले होते, माझ्या वक्तव्याचा विपर्यास करण्यात आला आहे, असेही ते यावेळी म्हणाले. ८ लाख उत्पन्नापेक्षा कमी उत्पन्न असलेल्या परिवारातील विद्यार्थ्यांची फी माफी, १० लाखांपेक्षा कमी उत्पन्न असलेल्या कुटुंबाची कर्जमाफी असे अनेक निर्णय मराठा समाजाच्या हितांसाठी घेण्यात आले आहेत. यासाठी चर्चा करणे आवश्यक आहे, चर्चेतून मार्ग निघेल.
 
विरोधक त्यांचे काम करत आहेत, सामान्य मराठा माणसाने सरकारवर विश्वास ठेवावा :

माध्यमांनी त्यांना 'मराठा समाजासाठी सरकार काहीच काम करत नाही, असे विरोधक सांगतायेत यावर तुमचे काय मत?" असा प्रश्न विचारला असता ते म्हणाले की, "गेल्या दोन वर्षात जे काही आम्ही मराठा समाजासाठी केले ते मी आताच सांगितले, यावर देखील जर विरोधक म्हणत असतील की आम्ही काहीच केले नाही, तर विरोधक त्यांचे काम करत आहेत, सामान्य माणसाने सरकारवर विश्वास ठेवावा. सरकार मराठा समाजाच्या हितासाठीच कार्य करत आहे." असे मत व्यक्त केले.
 
 
मुख्यमंत्री बदलण्याचे काहीच कारण नाही :

१२ कोटी जनतेचे ते मुख्यमंत्री आहेत. त्यांची कुठल्य़ाही समाजाला दुजा भाव दिला नाही. 'हा समाज माझा हा तुमचा' असे कधीच केले नाही. मुख्यमंत्री अत्यंत कर्तव्यदक्ष आहेत आणि संवेदनशील देखील त्यामुळे जे लोक मुख्यमंत्री बदलण्याविषयी बोलत आहेत, त्यांना मी सांगू इच्छितो असे कधीच होणार नाही. असे देखील ठाम शब्दात त्यांनी सांगितले. मराठा समाजाच्या काही लोकांनी मुख्यमंत्री बदलण्याची मागणी केली असताना त्यावर उत्तर देत ते
 
@@AUTHORINFO_V1@@