भारताला रशियाकडून एस-४०० क्षेपणास्त्र खरेदी करता येणार

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    25-Jul-2018
Total Views |



नवी दिल्ली : रशियाकडून एस-४०० ही अत्याधुनिक हवाई सुरक्षा क्षेपणास्त्र खरेदीचा भारताचा मार्ग मोकळा होण्याची शक्यता आहे. अमेरिका सीएएटीएसए या विशेष कायद्यातून भारताला सवलत देणार असल्याने ही खरेदी शक्य होणार आहे. भारत रशियाकडून पाच क्षेपणास्त्र खरेदी करणार असून एकूण ३९ हजार कोटींना हा व्यवहार होणार आहे. दरम्यान, सीएएटीएसए या कायद्यातंर्गत रशियाकडून शस्त्रास्त्र खरेदी करण्यावर निर्बंध आहेत.

 

अमेरिकेच्या विरोधात जाऊन जर भारताने हा करार केला असता, तर भारतावर आर्थिक निर्बंध लादला जाण्याची शक्यता होती. मात्र, आता अमेरिकने भारताला सीएएटीएसए या कायद्यातून सवलत देण्याचा निर्णय घेतल्यामुळे भारताचा मार्ग मोकळा झाला आहे. भारतासोबतच इंडोनेशिया आणि व्हिएतनाम या दोन देशांना या कायद्यातून सवलत मिळणार आहे. यापूर्वी संरक्षणमंत्री निर्मला सीतारमन् यांनी अमेरिकेचा विरोध झुगारून ही क्षेपणास्त्र खरेदीची तयारी दर्शवली होती. ऑक्टोबर २०१६ मध्ये रशियाचे राष्ट्राध्यक्ष पुतिन यांच्या भारत दौर्‍यादरम्यान गोव्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत झालेल्या बैठकीत एस-४०० क्षेपणास्त्रांबाबत करार करण्यात आला होता.

@@AUTHORINFO_V1@@