मेहसाणा हिंसेसाठी हार्दिक पटेलसह तिघांना दोन वर्षांची शिक्षा

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    25-Jul-2018
Total Views |



गांधीनगर : पाटीदार समाजाचा नेता हार्दिक पटेल आणि त्यांच्या दोन सहकाऱ्यांना मेहसाणा दंगलप्रकरणी दोन वर्षांची शिक्षा गुजरात न्यायालयाने सुनावली आहे. २०१५ मध्ये हार्दिक पटेल आणि त्यांच्या दोन सहकाऱ्यांनी भाजप नेत्याच्या कार्यालयाची तोडफोड केली होती. याप्रकरणी न्यायालयामध्ये सुरु असलेल्या सुनावणीमध्ये न्यायालयाने आज या तिघांनाही दोन वर्षांची शिक्षा सुनावली आहे.

लालजी पटेल आणि ए.के.पटेल अशी शिक्षा सुनावलेल्या आरोपींची नावे आहे. २०१५ मध्ये मेहसाणा येथे पाटीदार समाजाकडून काढण्यात आलेल्या एका मोर्चा दरम्यान हार्दिक पटेल याच्या चिथावणीखोर वक्तव्यामुळे हिंसा उसळली होती. यामध्ये हार्दिक पटेल आणि अन्य दोघा जणांनी भाजप नेते हृषीकेश पटेल यांच्या कार्यालयाची तोडफोड केली होती. यानंतर हृषीकेश पटेल या तिघांविरोधात गुन्हा दाखल केला होता. यानंतर त्यांच्यावर गुन्हा दाखल होऊन न्यायालयात त्यांच्या विरोधात खटला सुरु करण्यात आला. यावर आज अंतिम सुनावणी करत न्यायालयाने प्रत्येकी ५० हजार रुपये दंड आणि २ वर्षांची शिक्षा या तिघांनाही सुनावली आहे.

दरम्यान न्यायालयाच्या या निर्णयानंतर हार्दिकने नेहमीप्रमाणे सरकार आणि इतर लोकांवर टीका केली आहे. समाजाच्या हितासाठी प्रयत्न करणे हे जर गुन्हा असेल तर आपण गुन्हेगार आहोत, अशी प्रतिक्रिया त्यानी यावर दिली आहे. तसेच कोट्यावधी गरिबांच्या भल्यासाठी तुरुंगात जरी जाण्याची वेळ आली तरी आपण मागे हटणार नाही, असे देखील त्याने म्हटले आहे.





 
@@AUTHORINFO_V1@@