शहरातील सर्व अनधिकृत धार्मिक स्थळे तात्काळ निष्कासित करा- आयुक्त

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    25-Jul-2018
Total Views |


 


ठाणे : महापालिका क्षेत्रात ज्या परिसरात अनधिकृत धार्मिक स्थळे आहेत , ती तात्काळ निष्कासित करण्याचे आदेश महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांनी अधिकार्यांना दिले. महापालिकेच्या नागरी संशोधन केंद्रात काल महापालिका आयुक्तांनी सर्व उपायुक्त, सहायक आयुक्त विभागप्रमुख यांची आढावा बैठक घेतली. या बैठकीत त्यांनी सर्व सहायक आयुक्त यांनी त्यांच्या स्तरावर अनधिकृत धार्मिक स्थळे तात्काळ निष्कासित करावीत; अन्यथा त्यांच्यावर कडक कारवाई करण्याचा इशारा यावेळी दिला.

 

पीजी पोर्टल, आपलं सरकार यावरील प्रकरणे १५ दिवसांमध्ये निकाली काढल्यास संबंधितांवर कठोर कारवाई करण्यात येणार आहे. यावेळी स्वच्छता निरीक्षकांनी शहरात फिरून कोणत्या ठिकाणी कचरा टाकला जातो, याचे सर्वेक्षण करून कचरा उचलण्याची कारवाई तात्काळ करावी, तसेच शहरातील सार्वजनिक शौचालये यांची दुरुस्ती साफसफाई करण्याच्या सूचना दिल्या आहेतदरम्यान शहरातील अनधिकृत बॅनर, झेंडे पुढील दिवसांत काढून टाकणे अशा सूचना त्यांनी या बैठकीत अधिकार्यांना दिल्या.

@@AUTHORINFO_V1@@