पाकिस्तानची दिवाळखोरी चव्हाट्यावर

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    25-Jul-2018
Total Views |


मुंबई : चीन व पाकिस्तान यांच्यासाठी महत्त्वाचा असणारा आणि पाकिस्तानचा आर्थिक कणा ताठ ठेवण्याच्याकामी महत्त्वपूर्ण भूमिका बजावणारा चीन-पाकिस्तान इकोनॉमिक कॉरिडॉर अर्थात ‘सीपीईसी’ मार्ग आर्थिककोंडीमुळे मोठ्या संकटात सापडला आहे. एकूण ५० अब्ज डॉलरचा असणारा हा प्रकल्प देशाचा राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण ही संस्था संकटात असल्याने आर्थिकदृष्ट्या गतप्राण होण्याच्या मार्गावर आहे. या प्रकल्पाच्या कार्यापोटी कंत्राटदारांना देण्यात आलेले पाच अब्ज डॉलरचे धनादेश न वटल्याने त्यांनी काम बंदचा निर्णय घेतला आहे. गेल्या अनेक दिवसांची तेथील ही स्थिती असून त्याबाबत सरकार गांभिर्याने पाहत नसल्याचे पाकिस्तानातील वृत्तपत्र ‘डॉन’ने म्हटले आहे. या प्रकल्पासंदर्भात अशा प्रकारची कोंडी होणार, याचे भाकीत धुरिणांनी फार पूर्वीच वर्तविले होते. मात्र, फार लवकर अशा कोंडीत सापडविणाऱ्या परिस्थितीचा सामना पाकिस्तानला करावा लागत असल्याचे चित्र जागतिक पटलावर उमटले आहे.

 

आर्थिक संकटामुळे ‘सीपीईसी’ चा हल्का-डेरा-इस्माइल खान हा पश्चिमेकडील मार्ग आणि कराची-लाहोर मोटारमार्ग अडचणीत सापडले आहे. पाकिस्तानसाठी हे दोन मार्ग म्हणजे त्यांच्या अर्थव्यवस्थेला गतिमानकारक ठरणार आहेत. मात्र, त्यांच्याच भवितव्याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाल्याने पाकिस्तानच्या आर्थिकनाड्या येणाऱ्या काळात आवळल्या जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे. या आर्थिककोंडीमुळे केवळ सीपीइसीचा मार्ग बाधित झाला नसून, त्याची देशांतर्गत बांधकाम व्यवसायास बसण्यवास सुरुवात झाली आहे. देशातील बडे कंत्राटदारांची आर्थिक गुंतवणूक या प्रकल्पात असल्याने व त्याचा परतावा त्यांना मिळत नसल्याने देशांतर्गत आर्थिक चलनवलनास मर्यादा आल्या आहेत. त्यामुळे त्याची झळ बांधकाम व्यावसायिक ते मजूर अशा सर्व वर्गांमध्ये सध्या बसत आहे.

 

बसलेल्या आर्थिक फटक्याविषयी बोलताना राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे प्रवक्ते काशिफ झामन म्हणाले की, “आम्हाला या प्रकल्पाच्या कार्यापोटी सरकारकडून पाच अब्ज डॉलरचा धनादेश देण्यात आला होता. त्यातील १.५ अब्ज डॉलरचा धनादेश त्याच दिवशी वटला. मात्र, उर्वरित रक्कमेचा धनादेश दुसऱ्या दिवशी जमा केला असता तो वटला नाही. यामुळे प्राधिकरणाला विविध समसस्यांचा सामना करावा लागत असून यातून सरकार लवकरच योग्य तो तोडगा काढेल, असा आम्हाला विश्वास आहे.” या प्रकल्पामुळे कुठेतरी आम्हाला एक आशेचा किरण दिसत होता. मात्र, त्याची झालेली ही दुर्दशा म्हणजे सामजिक, आर्थिक आणि नैतिकदृष्ट्या बसलेला मोठा धक्का आहे. त्यामुळे प्रकल्पाचा विकास कुंठीत होणार असल्याची भावना प्रकल्पातील मजुरांनी व्यक्त केली आहे.

 

पाकच्या आर्थिक ओझ्याखाली चीन दबणार हे निश्चित.

 

हा प्रकल्प म्हणजे पांढरा हत्ती आहे. या प्रकल्पामुळे पाकिस्तान चीनच्या आर्थिक ओझ्याखाली दबणार हे निश्चित आहे. मुळात हा प्रकल्प ४५०० किमी लांब आणि ८००० फूट उंचीवरुन जातो त्यामुळे या रस्त्याला भाविष्यात मोठी देखभालीची गरज भासणार आहे. तसेच या प्रकल्पासाठी पाकला कर्ज देण्यात आले आहे. त्याचे साधे व्याजही पाक फेडू शकणार नाही. तसेच हा मार्ग मुळात आर्थिकसमृद्धीसाठी बनविण्यात आला आहे. मात्र, पाकला त्याची गरजच नाही. कारण त्यांचा मूळ आर्थिक उद्योग हा दहशतवाद आहे. त्यांना इतर आर्थिकबाबींची गरजच काय?

 

हा मार्ग चीनच्या शीनजियांग प्रांतात पोहोचतो. तिथे मोठ्याप्रमाणात इस्लामिक दहशतवाद माजला आहे. तसेच एवढे मोठे अंतर इतक्या मोठ्या उंचीवरून पार केल्यावर स्वाभाविकपणे तेथे उत्पादनाच्या किंमती वाढणार आहे. त्यामुळे वस्तुत: हा मार्ग निरुपयोगी आहे. एक भारतीय म्हणून या दोन्ही देशांचे यात नुकसान होत असल्याने मला त्याचा आनंद आहे.

- ब्रिगे. (निवृत्त) हेमंत महाजन

दोस्त दोस्त ना रहा...

 

‘शत्रूचा शत्रू तो आपला मित्र’ हे आंतरराष्ट्रीय राजकारणात सर्रास वापरले जाणारे सूत्र. याच धारणेतून भारतावर वचक ठेवण्यासाठी चीनने पाकिस्तानला साथीला घेत या प्रकल्पाचे काम सुरू केले. मात्र, कमकुवत घटक बरोबर घेतल्याचे चीनला जाणवले असावे. त्यामुळे अशा आर्थिक कोंडीवेळी चीनने पाकिस्तानला मदत केल्याचे किंवा करणार असल्याचे वृत्त नाही. त्यामुळे दोस्त अडचणीत सापडताच चीनने पाकला चॉपस्टीकमध्ये पकडत सोयीस्कररित्या बाजूला केले आहे की काय, अशी शक्यता वर्तविली जात आहे.

 

निवडणुकांमुळे कोंडी कायम राहणार?

 

आज २५ जुलै रोजी पाकमध्ये लोकशाही पद्धतीने सार्वत्रिक निवडणुका होत आहे. शरीफ सरकार आर्थिक घोटाळ्यांमुळेच गडगडले. त्यामुळे या प्रकल्पाचे भवितव्य काय? याबाबत मोठे प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

@@AUTHORINFO_V1@@